शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

उमदीमधील बेदाण्यास मिळाला उच्चांकी दर...

By admin | Updated: July 20, 2014 23:44 IST

प्रतिकूलतेवर मात : ३६१ रुपये किलो मिळाला दर

दरीबडची : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड देत जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. तासगाव बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या हिरव्या बेदाण्याला तब्बल ३६१ रुपये किलो इतका उच्चांकी दर मिळाला. दुष्काळी परिस्थितीत गारपीट, अवकाळी पाऊस, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तालुक्यातील बेदाणा उत्पादनात घट झाली असली, तरी बाजारात बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला आहे. निसर्गाने मारले, दराने तारले, अशी परिस्थिती द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांची झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बागायती पिके न घेता ठिबक सिंचनाचा वापर करीत द्राक्षे, डाळिंब अशा फळबागांकडे वळला आहे. पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागातील उमदी, तिकोंडी, भिवर्गी, सिध्दनाथ, बिळूर, संख, डफळापूर, जालिहाळ खुर्द, मुचंडी, जालिहाळ बुदु्रक, कोंत्यावबोबलाद, दरीकोणूर या भागात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात द्राक्षबागांचे क्षेत्र ४ हजार ६० हेक्टर इतके आहे.गतवर्षी ११७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या होत्या. पाणी कमी असल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. काही बागांना घड विरळ सुटले होते; तर पाण्याअभावी ३० टक्के बागा वांझ झाल्या होत्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली होती. प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. औषधावर मोठा खर्च झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खत कमी प्रमाणात वापरले. एमओपी, डीएपी ७:१०:५, करंजी पेंड सीपीपीएम यासारख्या खतांचा वापर करता आला नाही. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लागली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले. पाण्याच्या व खताच्या योग्य मात्रेअभावी बेदाण्यास मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली होती. अवकाळी पावसामुळे, ढगाळ वातावरणामुळे बेदाणा काळा, डागी तयार झाला होता; मात्र यातून वाचलेल्या द्राक्षबागांच्या द्राक्षाचे उत्पादन चांगले झाले होते. (वार्ताहर)