शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘हुतात्मा’चा ३,३२५ रुपये उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्यास गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३,३२५ रुपये दर देणार आहे, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. राज्य शासनाची परवानगी घेऊन हे बिल ४ आॅक्टोबरला शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.हुतात्मा साखर कारखाना अधिमंडळाच्या ३७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्यास गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३,३२५ रुपये दर देणार आहे, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. राज्य शासनाची परवानगी घेऊन हे बिल ४ आॅक्टोबरला शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.हुतात्मा साखर कारखाना अधिमंडळाच्या ३७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष महादेव कांबळे, माजी अध्यक्षा नीलावती माळी, संचालिका आक्काताई गावडे, शालन रकटे प्रमुख उपस्थित होते.नायकवडी म्हणाले, देशात अतिरिक्त साखर असतानाही केंद्र सरकारने गेल्यावर्षी ५ लाख व यावर्षी ३ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला. हुतात्मा कारखाना बायंडिंग मटेरियलसह शेतकºयांना उच्चांकी ऊसदर देत आहे. त्यामुळे बायंडिंग मटेरियलचा एक टक्काप्रमाणे प्रत्यक्ष ३३.२५ रुपये दर शेतकºयांना वाढवून मिळतो. परंतु कारखान्याचे प्रतिटन ४.२५ तोडणी व वाहतूक खर्च वाढतो. रिकव्हरीत घट सोसावी लागते. त्यामुळे प्रतिटन ४१.७९ पैसे नुकसान होते. कारखान्याची गतवर्षीची एफआरपी प्रतिटन २,७२० रुपये असताना, प्रत्यक्ष बायंडिंग मटेरियलसह ३,३२५ रुपये दर देत आहोत. १ ते १५ मार्चदरम्यान गाळपास आलेल्या उसाला ३,४०८ रुपये, १५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान गाळपास आलेल्या उसाला ३,४३९ रुपये, तर १ एप्रिलच्या पुढील उसाला ३,४५९ रुपये दर देणार आहे.यातून मुख्यमंत्री निधी प्रतिटन ४ रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेसाठी १ रुपया, साखर संघासाठी १ रुपया व भागविकास निधीसाठी प्रतिटन ४४ रुपये, याप्रमाणे एकूण ५० रुपये कपात करण्यात येईल.यावेळी साखर उद्योगाचे व ऊस उत्पादनाचे ५ वर्षांसाठी स्थिर धोरण असावे, एफआरपीपेक्षा जादा दिल्या जाणाºया ऊसदरावर आयकर आकारला जाऊ नये, कारखान्याच्या स्वत: चालविलेल्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी प्रती युनिट १ रुपया २० पैसे आकारणी केली जाते, ती करण्यात येऊ नये, पॉवर पर्चेस अ‍ॅग्रिमेंट जुन्या दराने पीपीए करुन घ्यावेत, हे चार ठराव करण्यात आले.प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी स्वागत केले. ऋण व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी हिशेबपत्रके सादर केली.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.इथेनॉल प्रकल्पाचे २० कोटी फेडलेनायकवडी म्हणाले, ‘हुतात्मा’मुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांमध्ये जागरुकता निर्माण झाली. महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांना शेतकºयांना ऊसदर देणे भाग पडले. हुतात्मा साखर कारखाना म्हणजे आपल्या भाकरीचा प्रश्न आहे. साखर कारखाना सभासदांना दर महिन्याला १५ किलो साखर ४ रुपये किलो दराने देतो. तसेच दीपावलीसाठी जादा १० किलो साखर देतो. या कमी दराच्या साखरेसाठी कारखान्याला १ कोटी ५७ लाख रुपये कर भरावा लागतो. त्यामुळे ६ कोटी ७५ लाख रुपयांचा बोजा कारखान्याला सहन करावा लागतो. गत हंगामात इथेनॉल प्रकल्पाची चाचणी झाली आहे. प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच त्यासाठी घेतलेले २० कोटीचे एनसीडीटीचे कर्ज भागविले आहे.