शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात मोठ्या गावांत होणार हाय होल्टेज ड्रामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST

तासगाव : तासगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या गावांत हाय होल्टेज ड्रामा रंगणार आहे. सावळज, विसापूर, येळावी, मांजर्डे, ...

तासगाव : तासगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या गावांत हाय होल्टेज ड्रामा रंगणार आहे. सावळज, विसापूर, येळावी, मांजर्डे, कवठेएकंद या गावांतील लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले असून या गावांतील कारभार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. आयाराम- गयारामांमुळे अनेक गावांतील समीकरणे बदलली असल्याने सत्तेचा तराजू दोलायमान झाला आहे.

तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच गावांतील कारभार्‍यांनी मिशन ग्रामपंचायत सुरु केले असले तरी, मोठी लोकसंख्या असणाऱ्या गावांतच हाय होल्टेज ड्रामा रंगणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद गटांचा केंद्रबिंदू असणाऱ्या सावळज, विसापूर येळावी, मांजर्डे या गावांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या गावांसह बोरगाव, पेड, कवठेएकंद, हातनूर ही गावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह लोकसभा आणि विधानसभेसाठी या गावांचे मतदान निर्णायक ठरणारे असल्याने, नेत्यांचेही या गावांतील घडामोडींवर लक्ष आहे. हाय होल्टेज ड्रामा असणार्‍या गावांमध्ये हातनोली, डोंगरसोनी, गव्हाण या गावांचाही समावेश आहे. तालुका आणि जिल्ह्यावर पद मिरविणार्‍या नेत्यांमुळे या गावांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

चौकट

आयाराम-गयारामांनी बदलली समीकरणे

पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्ता, खुर्चीच्या अट्टाहासातून पाच वर्षांत अनेक समीकरणे बदललेली आहेत. निवडून आलेल्या सरपंच, सदस्यांपासून पॅनेल प्रमुखांपर्यंत अनेकांनी या गटातून त्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आयाराम-गयारामांच्या भूमिकेमुळे डोंगरसोनी, गव्हाण, गौरगाव, हातनोली, कौलगे, कवठेएकंद, सावळज, सिध्देवाडी, व्रजचौंडे, विसापूर या गावांतील समीकरणे बदलणार आहेत.

चौकट

कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीत पदाधिकारी असणार्‍या कारभार्‍यांच्या गावात निवडणूक होणार असल्याने या गावांतील पदाधिकार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पेडमध्ये जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, मांजर्डेत पंचायत समितीच्या सभापती कमलताई पाटील, विसापुरात जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, सावळजमध्ये जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, येळावीत पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, काँग्रेसचे अमित पाटील, हातनोलीत बाजार समितीचे सभापती अजित जाधव, पंचायत समितीचे सदस्य सुनील जाधव, बोरगावमध्ये पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे