शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खरसुंडीत विकास सोसायटीकडून उच्चांकी कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील विकास सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एक कोटी ३९ लाख रुपयांचे उच्चांकी कर्जवाटप करून, शेतीउपयोगी ...

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील विकास सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एक कोटी ३९ लाख रुपयांचे उच्चांकी कर्जवाटप करून, शेतीउपयोगी वाहनांचे वितरण जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा. बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक असून वसुलीसाठी तितक्याच जबाबदारीने सहकार्य करावे. बँक आपल्या कर्ज प्रकरणात येणाऱ्या अडचणींचा सकारात्मक विचार करेल.

यावेळी बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, काँग्रेसचे युवक नेते जयदीप भोसले, बाजार समितीचे संचालक विजय पुजारी, विकास सोसायटीचे अध्यक्ष किशोर पुजारी, माजी अध्यक्ष भगवान भिसे, माजी सरपंच अर्जुन सावकार उपस्थित होते.

संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पाटील म्हणाले, शासन नोकरभरती करत नसल्याने, बँकेच्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. सर्वसामान्यांपर्यंत बँकेच्या विविध योजनांची माहिती पोहोचत नाही. यासाठी विकास सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेशी समन्वय ठेवावा. लाभार्थ्यांना मध्यवर्ती बँकेच्यावतीने कर्ज देण्याचा प्रयत्न करावा.

संस्थेचे अध्यक्ष किशोर पुजारी म्हणाले, तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये टेंभू योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत असल्याने, शेतीसाठी चांगले दिवस आले आहेत. शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेने अटी, नियमांमध्ये शिथिलता आणून सहकार्य करावे.

बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड म्हणाले, शेतकऱ्यांची कर्ज घेताना होणारी वाताहत थांबविण्यासाठी स्थानिक बँक व्यवस्थापकांना जादा अधिकार देण्यासाठी सकारात्मक विचार व्हावा.

नंदकुमार निचळ यांनी आभार मानले.

फाेटाे : ०४ खरसुंडी १