शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नको असलेले मूल देण्यासाठी आता हेल्पलाईन

By admin | Updated: July 24, 2016 00:58 IST

अडचणीत सापडलेल्या मातांसाठी मदतीचा हात : बालसंकुल, केएमए, महिला दक्षता समितीचा पुढाकार

कोल्हापूर : परिस्थितीमुळे काही मातांवर आपल्या नवजात शिशूला सोडून देण्याची वेळ येते. त्यातून हे मूल काही वेळा रस्त्यावर, कधी कोंडाळ्यात, कधी उघड्यावर टाकले जाते त्यातून बाळाला इन्फेक्शन होतात, आजारपण येते, काहीवेळा असुरक्षित गर्भपात केला जातो, हे सगळे टाळण्यासाठी बालकल्याण संकुल, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समितीच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या मातांना मदतीचा हात देण्यात आला आहे. मे महिन्यात एका मातेने आपले नवजात अर्भक गंगावेशेत सोडले होते. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या या बाळाला इन्फेक्शन झाल्याने या मुलीला सीपीआरमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले होते. अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडतात. यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊन त्याचा जीव धोक्यात येतो. भ्रूणहत्या व शिशू हत्या टाळण्यासाठी व मूल टाकून देण्याच्या या घटनांना आळा बसावा यासाठी बालकल्याण संकुल, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समितीने नको असलेले मूल आम्हाला द्या, अशी हाक दिली होती. त्याचे पुढचे पाऊल म्हणून या संस्थांच्या पुढाकारातून हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल, दवाखाने, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तसेच मेडिकलमध्येही हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. याशिवाय एसटी स्टॅन्ड, सार्वजनिक ठिकाणीही नंबरचे पत्रक चिकटवण्यात आले आहे. बालकल्याण संकुलातर्फे अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. तसेच अडलेल्या महिलेला विनाअट प्रवेश दिला जातो. संस्थेने आजवर २०० हून अधिक बालकांना दत्तक देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे ज्या पालकांना मूल नको असेल, त्यांनी ते रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकण्याऐवजी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून या घटनेबद्दलची पूर्ण गुप्तता पाळली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)