कवठेमहांकाळ येथील बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने कोरोनामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. यावेळी गुरव बोलत होते.
बाळासाहेब गुरव कॉलेजतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि ड्रेस चे मोफत वाटप करुन एक सामाजिक बांधिलकी या कॉलेजने जपली आहे. .हायस्कूलने कोरोनाचे महाभंयकर संकट सुरु असताना मागील वर्षी व यावर्षी ऑनलाईन तासिका सुरु केल्या आहेत. असे ही वैभव गुरव म्हणाले.
संस्थेचे कार्यवाहक
वैभव गुरव, संचालक नारायण पाटील, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक एन.एस.माने, पर्यवेक्षक सी.बी.घाटे,ज्युनिअर कॉलेज प्रमुख प्रा.एस.डी.पाटील, विद्यार्थी,पालक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नियोजन एस.आर.सावंत,एम.टी. शेळके,सूत्रसंचालन ए.एल.माने तर आभार शेळके यांनी मानले.