सांगली : डी. एन. ए. ॲकॅडमीचे डॉ. संदीप पाटील व ॲड. धनंजय मद्वाण्णा यांच्यावतीने सांगली जिल्हा सुधार समितीकडे ४ नवीन ऑक्सिजन सिलिंडर व फ्लोमीटर, तसेच नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या आरोग्यविश्व कोव्हिड केयर सेंटरला आणि नगरसेवक अभिजित भोसले यांच्या डॉ. पतंगराव कदम कोव्हिड सेंटरला औषधे उपलब्ध करून दिली. समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे, उपाध्यक्ष जयंत जाधव, शहराध्यक्ष महालिंग हेगडे, संतोष शिंदे, विजय आवळे, प्रचल तासगावकर, राहुल वायदंडे, योगेश गलांडे, अविनाश साळुंखे, चंदू पडसलगी आदी उपस्थित होते.
------
वखार भागातील खड्डा मुजविला
सांगली : वखार भागातील सत्यविजय बँकेसमोर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खड्डा काढण्यात आला होता. हा खड्डा तातडीने मुजवावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे संदीप टेंगले, दयानंद मलपे यांनी दिला. आंदोलनाचा इशारा देताच महापालिकेने तातडीने हा खड्डा मुरुम टाकून मुजविला.
---------
प्लास्टिक कचरा झाला उदंड
सांगली : शहरातील गटारी, नाले तुंबून गुरुवारी दूषित पाणी नागरी वस्तीत शिरले. या नाले, गटारीच्या स्वच्छता करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. गटारी, नाल्यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्याचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्याने ते तुंबले होते.