शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

राष्ट्रवादीसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 20, 2015 00:17 IST

इस्लामपूर सभागृह नामकरण प्रश्न : वसंतदादांचे नाव पुसले जाणार नाही : रवींद्र बर्डे

अशोक पाटील - इस्लामपूर वाळवा तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीतील सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठरावाप्रमाणे नाव देऊच, शिवाय वसंतदादांचा अवमान न करता जुन्या सभागृहाला दिलेले त्यांचे नाव तसेच ठेवू. त्यामुळे नामांतराचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका सभापती रवींद्र बर्डे यांनी घेतली आहे. याउलट राजारामबापू हे राष्ट्रीय नेते अथवा थोर पुरुष नसल्याचा पुरावा देऊन, त्यांचे नाव नूतन सभागृहाला देता येत नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दृष्टीने हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे.माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून इस्लामपूर मतदारसंघात सर्वच शासकीय, निमशासकीय इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून वाळवा पंचायत समितीची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीतील सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु त्याला काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी विरोध केला. सभागृहाला दिलेले पूर्वीचे वसंतदादा पाटील यांचे नाव तसेच ठेवावे, असा आग्रह त्यांनी धरला आहे. परंतु त्यांच्या आग्रहाला सत्ताधाऱ्यांनी जुमानले नाही. यामुळेच या प्रश्नात जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी लक्ष घालून सभागृहावर वसंतदादांच्या नावाचा फलक लावला. या प्रश्नावर रवींद्र बर्डे यांनी तोडगा काढला आहे. ते म्हणतात, ‘आम्ही वसंतदादांचा आदर करतो. जुन्या इमारतीतील सभागृहाचे नाव आम्ही तसेच ठेवणार आहोत. नवीन इमारतीतील सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.’नामांतराचा प्रश्न प्रकाश पाटील यांनी तडीस लावण्याचे ठरवले आहे. त्यांनी कायदेशीर मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची कागदपत्रे माहितीच्या अधिकाराखाली गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी दोन्ही नेत्यांच्या नावावरून सुरु असलेला वाद मिटविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.शासनाचे पत्रक : नेमके काय?प्रकाश पाटील यांनी प्राप्त केलेल्या शासन आदेशात, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये थोर नेते, राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र लावण्याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये २१ जणांच्या नावांचा समावेश आहे. त्यात वसंतदादा पाटील यांचे नाव आहे. मात्र राजारामबापू पाटील यांचे नाव नाही. प्रकाश पाटील हा शासनआदेश सभागृहाच्या नामांतर प्रश्नासाठी वापरत आहेत. वास्तविक तो आदेश छायाचित्राबाबत आहे. नामांतराच्या प्रश्नाला गटविकास अधिकारी जबाबदारगटविकास अधिकारी हे पद शासन आणि जनतेमधील दुवा आहे. हेच अधिकारी सत्ताधाऱ्यांपुढे हतबल झाले आहेत. ही प्रशासकीय इमारत बांधकाम विभागाकडून हस्तांतरित झालेली नाही, असे गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मग १ एप्रिल २0१५ रोजी त्यांनी उद्घाटन कार्यक्रम कसा घेतला? तसेच नवीन इमारतीतील अंतर्गत कार्यालये सुरु करण्याचा त्यांना काय अधिकार? नामांतराच्या प्रश्नालाही सर्वस्वी गटविकास अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप पेठ येथील पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी केला आहे.