शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पाथरपुंज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पाथरपुंज येथे ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासात दीड टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. परिसरात अतिवृष्टी होत असल्याने पाण्याची पातळीही वेगाने वाढत आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर पावसाचे आगर समजले जाते. येथे वार्षिक चार ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतोय. गतवर्षी पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदाही पाथरपुंज येथे गेल्या २४ तासात ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चांदोली धरणात पाथरपुंजपासूनच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होत असते. पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या १९ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. विसर्गही वाढवला आहे. १ हजार ५३३ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. ओढ्या-नाल्यांचे पाणी व धरणातील पाणी यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी ६०३.४० मीटर झाली आहे; तर पाणी साठा १५.१२ टीएमसी असून त्याची टक्केवारी ४३.९५ अशी आहे.

गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसासह एकूण २८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. असाच पावसाचा जोर वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा वेगाने वाढणार आहे.

चौकट

धबधबे कोसळले

गेल्या चोवीस तासात दीड टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला, तर पाणी पातळी १.१० मीटरने वाढली आहे.

चांदोली धरण परिसरातील संततधार पावसाने डोंगर-दऱ्यातील धबधबे कोसळत आहेत. परिसर हिरवाईने नटला आहे. हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.