शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

शिराळ्यात मोरणाकाठी स्वर्गीय नर्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:25 IST

सहदेव खोत । लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्राच्या प्रा. ...

सहदेव खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कपुनवत : चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्राच्या प्रा. डॉ. रेखा देवकर यांना शिराळा येथे मोरणा नदी परिसरात ‘स्वर्गीय नर्तक’ या दुर्मिळ पक्ष्यांची जोडी दृष्टीस पडली. सुमारे तासाभराच्या निरीक्षणात देवकर यांनी या पक्ष्यांच्या हालचाली टिपल्या.शिराळ्याच्या पश्चिम व दक्षिण बाजूने मोरणा नदी वाहते. नदी परिसरात मुबलक झाडी आहे. शिराळा ते नाथ फाटा रस्त्यावरील बंधाऱ्यावरून डॉ. देवकर यांना रविवारी सकाळी ११:३० च्या दरम्यान पॅराडाइज फ्लायकॅचर अर्थात ‘स्वर्गीय नर्तक’ यांचा वावर आढळला.दुर्मिळ असणाऱ्या या पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. परंतु लांब शेपटी असणाºया प्रामुख्याने दोन प्रजाती आहेत. एक जात भारतात, तर दुसरी श्रीलंका येथे आढळते. त्याचे इंग्रजी नाव ‘एशियन पॅराडाईज फ्लायकेचर’ आहे, तर शास्त्रीय भाषेत त्याला ‘टेरसिफोन पॅराडाईज’ असे म्हणतात. नराला लांब शेपूट असते. त्यामुळे तो अतिशय सुरेख व देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढºया रंगाचा असतो, तर नवतरुण नर आणि मादी लाल रंगाची असते. याची मान व चोचीकडील भाग काळपट जांभळ्या रंगाचा असतो. त्याच्या डोक्यावर लहानसा तुरा असून, त्याची शेपटी दोन पिसांची एक ते दीड फुटापर्यंत लांब असते. हिमालय व उत्तर प्रदेशमधील डोंगररांगांमध्ये याचा जास्त वावर दिसतो. हा मध्य प्रदेशचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी हवेत संचार करतेवेळी हळुवार हवेत दोन तीन फुटांपर्यंत वर-खाली, वर-खाली करत एकीकडून दुसºया जागी जातो. त्यावेळी शेपटीतील दोन्ही पिसांची हालचाल कापडी रिबन हवेमध्ये फिरल्यासारखी दिसते. त्याचा आहार लहान किडे व अळ्या असतो. आपल्याकडे या पक्ष्यांचा वावर हा आंबा घाटातील विशाळगड रोडशेजारी जंगलात आहे; तर काही पक्षी निरीक्षकांना तो इचलकरंजी या भागात नदीकडील प्रदेशात आढळला असल्याचे बोलले जाते. आता शिराळ्याजवळील नदीकाठी दाट झाडीत पांढºया रंगाची शेपटी असलेला हा पक्षी दिसला. सुमारे पाऊण तास नर्तक पक्ष्यांची जोडी तेथील पाणवठ्याजवळ वावरताना दिसली.