शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी १८ ला सुनावणी

By admin | Updated: November 15, 2015 23:52 IST

सहकार मंत्र्यांसमोर याचिका : अधिकारी उपस्थित राहणार; चौकशीची पुढील दिशा ठरणार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या १७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाखल केलेल्या दोघा माजी अधिकाऱ्यांच्या याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चौकशीची पुढील दिशा यावेळी निश्चित होण्याची चिन्हे आहेत. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोन तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार विभागाकडे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्या निर्णयांविरोधात अपील केले होते. कागदपत्रांच्या प्रती विकत देण्याच्या मुद्द्यावर हे अपील होते. त्यामुळे सहकार विभागाने याप्रकरणी दोघा अधिकाऱ्यांपुरती चौकशीला स्थगिती दिली आहे. उर्वरित प्रकरणात चौकशी सुरूच ठेवण्याचा निर्णय चौकशी अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्याप्रमाणे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. सहकार मंत्र्यांसमोरील सुनावणीही येत्या १८ रोजी होणार असून, त्यावेळी चौकशी अधिकाऱ्यांनाही हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे यादिवशी होणारी चौकशी अधिकाऱ्यांसमोरील सुनावणी लांबणीवर जाणार आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. यातील काही संचालकांनी, अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले आहे. आणखी काहींचे म्हणणे अद्याप सादर होणार आहे. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात युक्तिवादाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. चौकशी अधिकाऱ्यांसमोर आजअखेर १०५ जणांनी म्हणणे सादर केले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात युक्तिवादास सुरुवात होणार होती, मात्र स्थगिती आदेशामुळे यास विलंब झाला आहे. आता सहकार मंत्र्यांसमोरील सुनावणी झाल्यानंतरच चौकशीच्या पुढील कामास गती येणार आहे. युक्तिवाद संपल्यानंतर आरोपपत्राची तयारी चौकशी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)प्रक्रिया अंतिम टप्प्यातवसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकार मंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.