शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मिरज अर्बन’ स्थगितीची २७ रोजी सुनावणी

By admin | Updated: March 3, 2016 00:02 IST

घोटाळा प्रकरण : मालमत्ता जप्तीबाबत सहकारमंत्र्यांचा निर्णय

मिरज : मिरज अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपये कर्ज घोटाळाप्रकरणी चौकशीत दोषी ठरलेल्या संचालकांच्या मालमत्ता जप्ती कारवाईस स्थगिती रद्द करण्याबाबत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावणी पुढे ढकलली. मंत्रालयात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान तीन मृत संचालकांची नावे वगळण्यासाठी मुदत देण्याची माजी संचालकांची मागणी मान्य करण्यात आली.मिरज अर्बन बँकेतील ११ कोटी ७५ लाख रुपये कर्ज घोटाळाप्रकरणी तत्कालीन १५ संचालकांची सहकार कायदा कलम ८८ प्रमाणे चौकशी करण्यात आली. जिल्हा निबंधक ए. पी. पाटील यांनी केलेल्या चौकशीत सुमारे ६ कोटी ४० लाख विनातारण व बोगस कर्ज वाटपातील अनियमिततेबद्दल दोषी ठरल्याबद्दल जबाबदारी निश्चित करून संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई सुरू करण्यात आली. सहकार विभागाच्या या कारवाईविरोधात माजी संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे दाद मागितली. तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चौकशीत दोषी ठरलेल्या व कर्ज घोटाळ्याची जबाबदारी निश्चित झालेल्या संचालकांच्या मालमत्तेच्या जप्ती व लिलावाच्या कारवाईस स्थगिती दिली. सत्ताबदलानंतर नवीन सहकार मंत्र्यांकडे बँकेच्या अवसायाकांनी संचालकांच्या मालमत्तेच्या जप्तीस स्थगिती रद्द करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)मुदतवाढीची मागणीबुधवारी सुनावणीदरम्यान बँकेच्या तीन माजी संचालकांचा मृत्यू झाला असल्याने त्यांची नावे वगळून म्हणणे सादर करण्यासाठी माजी संचालकांच्या वकिलाने मुदत देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आल्याने २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.