शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

माजी संचालकांच्या याचिकेवर आज सुनावणी

By admin | Updated: April 16, 2015 00:05 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या माजी संचालकांनी सहकार विभागाच्या कारवाईविरोधात दाखल केलेली याचिका बुधवारी न्यायालयीन पटलावर आली नाही. त्यामुळे याप्रकरणी गुरुवारी, १६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते प्रा. सिकंदर जमादार यांनी दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी शुल्काची जबाबदारी ४० तत्कालीन संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या या कारवाईविरोधात १७ माजी संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुरुवातीला द्विसदस्यीय खंडपीठाकडे सुनावणी सुरू होती. आता हे प्रकरण न्यायमूर्ती आर. एम. सावंत यांच्या न्यायालयात वर्ग झाले आहे. आज न्यायालयाच्या पटलावर हे प्रकरण आले नाही. त्यामुळे गुरुवारी १६ रोजी सुनावणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, उमेदवार यांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. प्रा. जमादार म्हणाले की, याप्रकरणी सहकार विभागाकडेही आम्ही न्याय मागितला होता. त्यांनी तो दिलेला नाही. आता न्यायालयातच आम्हाला याविषयीचा न्याय मिळेल. आम्ही आशावादी आहोत. ज्या प्रकरणाची चौकशीच अद्याप पूर्ण झालेली नाही, त्याच्या चौकशीचे शुल्क वसूल करण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचे मत आम्ही यापूर्वीही मांडले आहे. याच मुद्द्यावर आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. आमची बाजू योग्य असल्याने आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)निवडणुकीतून एकही माघार नाहीजिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असले तरी, एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज मागे घेतलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांनी धोरणात्मक बैठका २0 व २२ एप्रिल रोजी ठेवल्याने अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत शेवटच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या ४८२ अर्जांपैकी ३८४ जणांचे ४२१ अर्ज वैध ठरले आहेत. चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित झालेल्या २३ संचालकांसह ६१ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. तरीही २१ जागांसाठी तब्बल ३८४ जणांचे अर्ज अजूनही रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ११ ते २४ एप्रिलपर्यंत मुदत आहे. मुदत सुरू होऊन चार दिवस झाले तरी एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज मागे घेतलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी यंदा बॅँकेच्या निवडणुकीत दिसत आहे. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे अर्ज दाखल केल्याने त्यांच्याच आदेशानंतर अर्ज मागे घेतले जाणार आहेत. पक्षीय स्तरावर अद्याप कोणाचेही धोरण ठरलेले नाही. निवडणूक बिनविरोध होणार की स्वतंत्र पॅनेलमार्फत होणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नेते, कार्यकर्ते व इच्छुक निश्चिंत आहेत. त्यातच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.