शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोकरूडमध्ये ‘सर्वांना आरोग्य’चा फज्जा

By admin | Updated: February 14, 2016 00:50 IST

तीव्र आंदोलनाचा इशारा : ग्रामस्थांकडून रुग्णालय प्रशासन धारेवर

कोकरूड : ‘सर्वांना आरोग्य’ या संकल्पनेचा कोकरूड येथे पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या भोेंगळ कारभाराविरोधात येथील ग्रामस्थ व रुग्णांनी जोरदार वादावादी व बाचाबाचीने दोन तास परिसर निनादून सोडला. या प्रकारामुळे दोन्ही रुग्णालयांविरोधात असंतोष वाढला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय हे एकाच इमारतीमध्ये कार्यरत आहे. येथील तृतीय व चतुर्थ क र्मचारी व डॉक्टर उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडून पैशाची मागणी करत असतात व उपचार करण्याबाबत दिरंगाईही करत असतात. रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करणे, खासगी मेडिकलमधून औषध आणण्यास सांगणे, असे प्रकारही येथे घडले जातात. दोन्ही रुग्णालयांचा कारभार एकाच ठिकाणी चालत असल्याने वैद्यकीय अधिकारी आपली जबाबदारी टाळून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. मोफत औषध मिळत असतानाही येथील डॉक्टर बाहेरून औषधे आणण्यास का सांगतात, असा सवालही रुग्ण करत आहेत. सर्वांना आरोग्य ही संकल्पना मोफत असल्याने गरीब, कष्टकरी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्णालयामध्ये येतात. वर्षाभरापूर्वी जाब विचारूनही जर प्रशासनाल जाग येत नसेल, तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी लैलाबी मुलाणी, आनंदी घोडे, ताराबाई चव्हाण, लक्ष्मी लोखंडे, आनंदी इजारे, नदीना मुलाणी या ज्येष्ठ नागरिकांकडून रुग्णालयाने पैसे आकारले असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील अकरापैकी यावेळी डॉ. सलमा ईनामदार, पंकज प्रगट, शारदा कांबळे, पी. डी. पोस्कर, शिपाई पाटील, एस. एस. जांभळे असे सहाच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे कृष्णा नांगरे, विकास घोडे उपस्थित होते. (वार्ताहर)