शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

सावधान, उष्णतेचा ‘पारा’ वाढत आहे...

By admin | Updated: May 28, 2015 00:42 IST

तापमानाची तपासणी : अभियांत्रिकी विद्यार्थी करत आहेत सेन्सर पद्धतीने अभ्यास

नरेंद्र रानडे -सांगली -मागील चार वर्षाच्या मे महिन्यातील तापमानाचा आढावा घेतल्यास, सांगली जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी दुपारच्यावेळी नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या महिन्यात सांगलीचे सर्वाधिक कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. तापमान मोजणाऱ्या उपकरणांचा अभ्यास करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेतील सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी हवामान खात्याच्या कार्यालयास भेट देत आहेत. वारणाली परिसरातील पाटबंधारे कार्यालय आवारात जलविज्ञान प्रकल्पाचा उपविभाग असून, त्याअंतर्गत असणाऱ्या हवामान खात्यात दररोजच्या तापमानाची नोंद घेतली जाते. सांगली जिल्ह्यात सांगलीव्यतिरिक्त म्हैसाळ (ता. मिरज), शिगाव (ता. वाळवा) आणि अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे हवामान केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे कवठेएकंद (ता. मिरज), रुकडी आणि पेठ-इस्लामपूर येथे तापमानाची नोंद करण्यासाठी सेन्सर पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. तापमानाची प्रामुख्याने दोन पध्दतीने तपासणी करण्यात येते. यामध्ये सनशाईन रेकॉर्डर पध्दत महत्त्वाची आहे. थर्मामीटरसारख्या उपकरणाच्या साहाय्याने कमाल आणि किमान तापमान मोजण्यात येते. कमाल तापमान मोजण्यास पारा, तर किमान तापमान मोजण्यास अल्कोहोलचा वापर करण्यात येतो. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या कालावधीतील कमाल (जास्तीत जास्त) आणि किमान (कमीत कमी) तापमानाची नोंद हवामान खात्यात दररोज करण्यात येत आहे. हवामान केंद्राच्या आवारात बाष्पीभवनपात्र असून त्याद्वारे उष्णतेमुळे किती पाण्याची वाफ झाली, याची नोंद करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्यात सरासरी चार ते साडेचार मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. यावरूनच विविध कालवे व धरणांतील बाष्पीभवन किती प्रमाणात होते, याचा अंदाज येतो. मागील वर्षापेक्षा यंदा मात्र उष्णतेची तीव्रता अधिक असून, अजून काही दिवस तरी नागरिकांना उष्णतेचा त्रास होणार आहे. उन्हाळ्यात पाऊस पडला तर हवामानात बदल होतो. परिणामी तापमानाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात जोरात वारे वाहत असतील तरी देखील तापमान कमी होते. - एम. जी. मळवाडे, सहायक अभियंता श्रेणी २ सांगली.पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने मागील चार वर्षाचा आढावा घेतल्यास, यंदा मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानात वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात ४०.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले होते. - एस. आर. पाटणे, उपविभागीय अभियंता, जलविज्ञान प्रकल्प गेल्या तीन वर्षातील तापमानदिनांक व वर्षकमाल तापमान दिनांक व वर्षकमाल तापमानदिनांक व वर्ष कमाल तापमान २ मे २०१३३९२ मे २०१४३७,५२ मे २०१५३९४ मे २०१३३७.५४ मे २०१४३७४ मे २०१५३९११ मे २०१३३९.५११ मे २०१४३५११ मे २०१५३९२४ मे २०१३३६२४ मे २०१४३९.५२४ मे २०१५३६