शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची शिक्षिकेस मारहाण

By admin | Updated: January 20, 2017 23:04 IST

घरनिकीची घटना : शिक्षिका दीर्घ रजेवर

आटपाडी : घरनिकी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला मुख्याध्यापकाने किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवार, दि. ९ जानेवारी रोजी हा प्रकार घडूनही, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, पीडित शिक्षिका भीतीपोटी दीर्घ रजेवर गेली आहे.रविवार, दि. ८ जानेवारीरोजी आटपाडीत ‘नवोदय’ची परीक्षा होती. या परीक्षेसाठी घरनिकीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जावे, असा आदेश मुख्याध्यापकांनी पीडित शिक्षिकेला दिला होता. यावर, मधुमेह आणि रक्तदाबाचा विकार असल्याने रुग्णालयात जायचे आहे. त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही, अशी विनंती संबंधित शिक्षिकेने मुख्याध्यापकांना केली. त्यानंतर सोमवारी शाळा भरल्यावर मुख्याध्यापकाने या शिक्षिकेला कार्यालयात बोलावून घेतले. पण त्यांच्यासोबत ते काहीच बोलले नाहीत. १०-१५ मिनिटे तेथे थांबून पुन्हा शिक्षिका वर्गात गेली. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. पुन्हा काही वेळानंतर मुख्याध्यापक त्या शिक्षिकेच्या वर्गावर गेले आणि एकेरी भाषेत बोलत, ‘तू आॅफिसमध्ये चल आणि लेखी दे’ असा दम भरला.शिक्षिका कार्यालयात जात असताना तिच्या पाठीमागून मानेवर आणि डोक्यावर मुख्याध्यापकाने मारहाण केली. शिक्षिका मारहाणीमुळे खाली पडली. दुसऱ्या शिक्षकांनी उठवून बसविल्यानंतर शिक्षिकेने पोलिस ठाणे आणि शिक्षण विभागाकडे धाव घेतली. मात्र अद्याप पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांनी, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)निलंबनाची धमकीपीडित शिक्षिकेला यापूर्वीही किरकोळ कारणांवरून या मुख्याध्यापकाने वारंवार त्रास दिल्याची चर्चा आहे. वर्गात कचरा आहे, या कारणावरून थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे त्याने तक्रार केली होती. याशिवाय ‘तू इथून निघून जा, नाही तर तुला निलंबित करीन, तुला कायमची घरी घालवीन’, अशी धमकीही दिल्याने पीडित शिक्षिका मोबाईल बंद ठेवून, दीर्घकालीन रजेवर गेली आहे.गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशीगटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी घरनिकीत जाऊन संबंधित मुख्याध्यापकाची चौकशी केली. त्यावेळी, असे काही घडलेच नाही, असे मुख्याध्यापकाने सांगितले. या प्रकरणातील दुसरी बाजू ऐकून घेण्यासाठी पीडित शिक्षिका उपलब्ध नसल्याने, त्या हजर झाल्यानंतर चौकशी करण्यात येणार आहे.