शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

खातेप्रमुखांनी स्वीय निधी वेळेत खर्च करावा

By admin | Updated: June 3, 2015 01:05 IST

उपाध्यक्षांचा इशारा : शाळांना सौर अभ्यासिका वाटपाचा निर्णय

सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधीतून दिलेला निधी खातेप्रमुखांनी वेळेत खर्च करून लाभार्थींना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. खातेप्रमुखांकडून वेळेवर निधी खर्च झाला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी अर्थ समिती सभेत दिला. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील संगणक वेळेवर चालण्यासाठी सौर अभ्यासिका देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळांची गरज ओळखून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद स्वीय निधी उपलब्ध असतानाही खातेप्रमुखांकडून वेळेवर तो खर्च होत नाही. याबद्दल त्यांना वारंवार सूचना देऊनही मार्च एन्डलाच खर्च करण्याकडे त्यांचा कल असतो. घाईगडबडीने साहित्य खरेदी करून ते दर्जेदार मिळत नाही. चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्यामुळे लाभार्थींना निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जात आहे. लाभार्थींना दर्जेदार साहित्याचा पुरवठा करण्यासाठी म्हणून खातेप्रमुखांनी वेळेवर निधी खर्च करावा, अन्यथा त्यांच्यावरच कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत संगणक असूनही तेथे वीज नसल्यामुळे ते बंद आहेत. म्हणून तेथे सौर अभ्यासिका बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सुरेश मोहिते, तानाजी यमगर यांच्यासह सदस्य, मुख्य वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सुधारित खर्चाला मंजुरीजिल्ह्यातील बारा गावांतील पाणी पुरवठा योजनांमध्ये पाण्याची टाकीच तयार केलेली नाही. येथील कामामध्ये गैरव्यवहार नसतील, तर सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात येईल, असे अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सांगितले.