शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘डोर्ली’च्या खुनातील मुख्य सूत्रधार पत्नीच

By admin | Updated: December 11, 2015 01:06 IST

नातेवाईकांकडूनच खून : मोबाईलवरून उलगडा

जत : जत तालुक्यातील डोर्ली येथे २५ नोव्हेंबर रोजी विठोबा मुकिंदा सरगर (वय ८०, रा. कोंबडवाडी, (कोळी), ता. सांगोला जि. सोलापूर) यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार त्यांची पत्नी लक्ष्मीबाई विठोबा सरगर (वय ७०) ही असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजी महादेव लवटे (वय २४, रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) व सागर तुकाराम म्हारगुडे (२१, रा. तळेवाडी, ता. आटपाडी) या दोघांनी संगनमत क रून हा खून केला आहे. या तिघांनी खुनाची कबुली दिली आहे. त्यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, १९ डिसेंबरअखेर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विठोबा सरगर याने शिवाजी लवटे यास ७ हजार रुपये हातऊसने दिले होते. या प्रकरणात लक्ष्मीबाई हिने मध्यस्थी केली होती. वारंवार पैसे परत मागूनही त्याने दिले नाहीत. त्यामुळे विठोबा सरगर हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिला तू मध्यस्थी क रून पैशाची हमी घेतलीस; परंतु त्याने पैसे परत केले नाहीत म्हणून तो तिला सतत मारहाण करत होता.तुला पैसे दिल्यामुळे विठोबा मला सतत मारहाण करून त्रास देत आहे. त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असे लक्ष्मीबाईने शिवाजी लवटे यास सांगितले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शिवाजी पैसे परत करणार आहे, ते तुम्ही घेऊन या, असे लक्ष्मीबाईने पती विठोबा यास सांगून एसटीने नागज फाटा येथेपाठविले होते. तोपर्यंत शिवाजी याने सागर यास बोलावून घेतले होते. विठोबा एसटीमधून उतरल्यानंतर तिघाजणांनी दुचाकीवरून ढालगाव व कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे जाऊन मद्य प्राशन केले होते. सायंकाळी सात वाजण्याच्यादरम्यान ते डोर्लीजवळ असलेल्या मानेवाडी ते दुधाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सखाराम नाथा माने यांच्या शेताजवळ आले होते. तेथून शिवाजी व सागर याने लक्ष्मीबाईच्या सांगण्यावरून त्यांचा खून करून मृतदेह माने यांच्या शेतातील नाला बांधाच्याखाली टाकला होता. त्यानंतर ते फरारी झाले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बेवारस मृतदेह सापडला म्हणून महादेव धोंडीबा बंडगर (रा. डोर्ली) याने जत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. निरीक्षक श्रीकांत पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवून, दोन दिवसात दोन मारेकऱ्यांना व ७ डिसेंबर रोजी लक्ष्मीबाईस अटक केली आहे. (वार्ताहर)पोलिसांच्या कसून चौकशीतून निष्पन्नसंशयित आरोपी शिवाजी लवटे याची लक्ष्मीबाई ही आत्या आहे, तर सागर म्हारगुडे याची मावशी आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल कॉल तपशिलावरून, लक्ष्मीबाई सरगर या पती विठोबा यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत, याचा उलगडा झाला आहे.