सांगली : शहरातील गावभाग येथील सिध्दार्थ परिसरात ड्रेनेज पाइपवरून झालेल्या वादावादीतून महिलेने दुसऱ्या महिलेच्या पाठीत वीट घालून तिला जखमी केले. याप्रकरणी भूपाल शंकर कुदळे (रा. सिध्दार्थ परिसर) यांनी सना मिलिंद कुदळे, कोमल महेश कुदळे यांच्याविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता व दुपारी चार वाजता हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही कुदळे कुटुंबांत ड्रेनेज पाइपमधून वास येत आहे या कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संशयित सना कुदळे हिने बांधकामास वापरण्यात येणारी भाजकी वीट उचलून फिर्यादी भूपाल कुदळे यांच्या पत्नी पुष्पा कुदळे यांच्या पाठीत मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर संशयित महिलांनी फिर्यादी व त्यांच्या मुलासही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.