शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उसानं मारलं, आता हळद तारणार का?

By admin | Updated: January 15, 2015 23:22 IST

शेतकऱ्यांचे दराकडे डोळे : २१ जानेवारीपासून हळद सौद्यास प्रारंभ

प्रताप महाडिक -कडेगाव -कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस दिला; परंतु सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र १९०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऊसदराच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अजूनही कारखानदार एफआरपीप्रमाणे दर देतील, अशी आशा बाळगून असलेला शेतकरी ऊस दरात मारला. आता हळद तरी तारणार का? या चिंतेत आहे. कडेगाव तालुक्यात उसाबरोबर हळद उत्पादन घेणारे हजारो शेतकरी आहेत. हे शेतकरी हळद कापणे, खांदणे, शिजवणे, पॉलिश करणे अशा कामात व्यस्त आहेत. शेतात काबाडकष्ट सुरू आहे; परंतु डोळे मात्र २१ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या हळद सौद्यात दर किती निघतोय, याकडे लागले आहेत.साखर कारखान्यांनी दिलेल्या ऊसबिलातून उत्पादन खर्चाइतकी रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीककर्जही या बिलातून परतफेड झाले नाही. कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी उसाबरोबरच हळद उत्पादनही घेतात. हे शेतकरी चार वर्षांपासून सातत्याने हळद दर घसरल्याने बेजार झाले आहेत. यावर्षी चांगला दर मिळेल, असे देशातील सर्वात मोठे हळद मार्केट असलेल्या सांगलीतील व्यापारी सांगत आहेत. येथे २१ जानेवारीपासून नवीन हळदीचे सौदे सुरू होणार आहेत. यामुळे आपली हळद लवकरात लवकर बाजारपेठेत जावी व चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एकरी सरासरी १० ते १५ क्ंिवटलपर्यंत हळद उत्पादन होते. प्रतिक्ंिवटल १० हजार ते १५ हजारपर्यंत दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हळदीचे दर बाजारपेठेतील हळदीची आवक, मागील वर्षाची शिल्लक हळद आणि उपलब्ध हळदीची प्रतवारी यावर निघतात. मुळातच अजून कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला दर दिलेला नाही. यामुळे अस्वस्थ बनलेला शेतकरी आता हळदीला तरी चांगला दर मिळेल का, याच्या चिंतेत आहेत.दहा हजार भाव मिळण्याची शक्यतासांगलीचे हळद व्यापारी राजू मेनकर यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांत हळदीचे भाव घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांनी हळदीकडे पाठ फिरवली. राज्यात ३० टक्के हळदीचे क्षेत्र कमी झाले. कर्नाटकात मागील वर्षाची हळद शिल्लक नाही. राज्यात २५ लाख पोती शिल्लक आहेत. परंतु त्यापैकी सर्रास हळद शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे. यातील ५ टक्केच हळद व्यापाऱ्यांची आहे. उसाचे क्षेत्र वाढले आणि हळद कमी झाली. यामुळे यावर्षी हळदीचे दर स्थिर राहतील. सरासरी १० हजारांच्या पुढे दर राहतील. शिवाय चांगल्या प्रतीच्या निवडलेल्या हळदीला १४ ते १५ हजारपर्यंत भाव मिळेल. यापुढील तीन वर्षातही हळदीला उच्चांकी दर मिळेल, अशी शक्यता आहे.