शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ कोणत्या साबणाने अंघोळ केली?

By admin | Updated: May 22, 2017 23:24 IST

‘त्यांनी’ कोणत्या साबणाने अंघोळ केली?

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मिरज पॅटर्नचे नाव घेऊन काहीजण स्वत:च्या पक्षाची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधीकाळी तेही मिरज पॅटर्नमध्येच नांदायला होते. कोणत्या साबणाने अंघोळ करून ते स्वच्छ झाले? मिरजेतील नगरसेवक कोणाच्या दारात पक्षप्रवेशासाठी गेलेले नाहीत. उलट त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच आमच्या घरात घुसून, पक्षात या, असे साकडे घालत आहेत, अशा शब्दात माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत भाजप व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, विवेक कांबळे, नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार बैठक घेऊन मिरज पॅटर्नची भूमिका मांडली. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिरज पॅटर्नमधील नगरसेवकांना पक्षात घेऊ नये, अशी मागणी नुकतीच करण्यात आली होती. तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही मिरज पॅटर्नला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर मिरजेतील नगरसेवकांनी एकत्रित येत भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला. नायकवडी म्हणाले की, मिरज पॅटर्नमधील नगरसेवकांना पक्षात प्रवेश देणार नाही, असे काहीजण सांगत आहेत. पण आम्ही कोणाच्या दारात गेलो आहे? त्यांच्याकडे पक्षात प्रवेश द्या, म्हणून साकडे घातले आहे? उलट त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी आमच्या संपर्कात आहेत. खालचे कार्यकर्ते वाचाळवीराप्रमाणे व्यक्तव्ये करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मंडळींनी कोल्हेकुई बंद करावी. २०१८ च्या निवडणुकीची भाषा ते करीत आहेत. पण त्यांनी एक तरी नगरसेवक निवडून आणला आहे का? मिरजेतील जनमानसात आमची चांगली प्रतिमा असल्याने आम्ही एकत्र आलो. जनतेची कामे करीत असल्याने कधी पक्ष, नेत्यांची गरज भासली नाही. मिरजेतील १४ नगरसेवक एका विचाराने एकत्र आले आहेत. सांगली व कुपवाडचे पाच नगरसेवकही संपर्कात आहेत. ही मंडळी एकत्र आली, तर आमचे काय होणार, याची चिंता त्यांना सतावत आहे. या भीतीपोटीच मिरज पॅटर्नचे नाव घेऊन बदनामी सुरू आहे. कधीकाळी हीच मंडळी मिरज पॅटर्नमध्ये नांदायला होती. आता ती स्वच्छ असल्याचा आव आणत आहेत. त्यांनी कोणत्या साबणाने अंघोळ केली आहे? असा टोलाही त्यांनी लगाविला. आम्ही कुठल्याही पक्षाच्या मागे लागलेलो नाही. उलट भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसची नेतेमंडळी आमच्या संपर्कात आहेत. तेच आमच्या दारात घुसत आहेत. आगामी वर्षभर आम्ही सर्वांशी विचारविनिमय करू. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नायकवडी यांनी स्पष्ट केले.