शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वन्यजीवांसाठी त्यांनी तयार केला पाणवठा

By admin | Updated: May 28, 2016 00:53 IST

पाण्याचे स्रोत बंद : युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उपक्रम

 मानाजी धुमाळ -- रेठरेधरण उन्हाचा तडाखा व दुष्काळाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे स्त्रोत बंद झाले असताना तहानलेल्या पशु-पक्षी व प्राण्यांच्या जिवांची तडफड पाहून रेठरेधरण (ता. वाळवा) येथील सतत विधायक कार्यात सहभागी असणारे युवक मदन पाटील व झुंझार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डोंगरातील वन्यप्राणी व पशु-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगरपायथ्याशी पाणवठा करुन मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी एक आदर्शवत उपक्रम केला आहे.रेठरेधरण येथील गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या परीटकी नावाच्या माळरानाजवळ डोंगरातून पाण्यासाठी भटकणारे ससा, कोल्हा, लांडगा, तरस हे वन्यप्राणी तसेच मोर, लांडोर, चिमण्या व कावळे या पक्ष्यांना सिमेंटच्या टाकीमध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ््यामध्ये अनेक पक्षी व प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत असताना, या प्राण्यांवर दया दाखवून आपल्यातील एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न युवकांनी केला आहे. परीटकी नावाच्या क्षेत्राजवळ ओढा व विहिरी आहेत, पण यंदा पाणी आटल्यामुळे रात्रीच्या वेळेस प्राणी पाणी पिण्यासाठी शोधाशोध करुन थकून जायचे. त्यामुळे मदन पाटील व झुंझार गणेश मंडळातील कार्यकर्ते रघुनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, विजय कवठेकर, दत्तात्रय कदम, भरत कदम, अक्षय पाटील, रोहित सुतार, वैभव पाटील या युवकांनी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मदन शिवाजी पाटील यांच्या विहिरीतून पाईपद्वारे पाणी कुंडात भरले जाते. माळावर दोन ठिकाणी प्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे.परीटकीकडे जाणाऱ्या व रस्त्यालगत रंगराव कापसे व सुभाष कापसे यांनीदेखील विहिरीचे पाणी सिमेंट कुंडामध्ये ठेवले आहे. या पाणवठ्याचा उपयोग प्रामुख्याने मोर, लांडोर यांना होत आहे. युवकांकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे प्राण्यांची सोय होत असून, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.