शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बेळंकीच्या विकासनगर शाळेची ‘आयएसओ’ मानांकनात ‘हॅट्ट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 23:59 IST

जिल्हा परिषदेची शाळा : विविध शैक्षणिक उपक्रमांची घेतली दखल

मिरज : विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या बेळंकीतील विकासनगर जिल्हा परिषद शाळेने सलग तिसऱ्यावर्षी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले आहे. आज आॅस्ट्रियाच्या कंपनीचे प्रतिनिधी राजीव जम्मीहाल यांनी शाळेच्या उपक्रमांची पाहणी करून मानांकन जाहीर केले.विकासनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सलग तीन वर्षे आयएसओ मानांकन मिळवून जिल्हा परिषद शाळांना सन्मान मिळवून दिला आहे. टीयुव्ही आॅस्ट्रिया कंपनीचे प्रतिनिधी राजीव जम्मीहाल यांनी शाळेने यावर्षी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची गुरुवारी तपासणी केली. मुलांनी तयार केलेल्या वस्तू, गोष्टी, कथा, कृती, मुलांच्या वह्यांतील निटनेटकेपणा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्ञानरचनावाद या पद्धतीने करण्यात येणाऱ्या अध्यापनाची त्यांनी प्रशंसा केली. शाळेने गुणवत्तेबाबत भरारी घेऊन आदर्श शाळा म्हणून नावलौकिक सिद्ध केल्याचे जम्मीहाल यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, पिरॅमिड अ‍ॅरोबिक्सची प्रात्यक्षिके सादर केली. तीन शिक्षक असलेली व आयएसओ मानांकन मिळविणारी राज्यातील ही एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, शिक्षक चंद्रकांत साळुंखे, प्रीया पाटील, शाळेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष अमृत कोरे, उदय पाटील, सहदेव हट्टे यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)छाननीनंतर प्रमाणपत्रशाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची छाननी पार पडल्यानंतर जम्मीहाल यांनी तिसऱ्या वर्षीही शाळा आयएसओ मानांकनासाठी पात्र ठरल्याचे जाहीर केले.