शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने हळदीच्या दराची अग्निपरीक्षा...

By admin | Updated: January 24, 2017 00:52 IST

दर आणखी गडगडणार : प्रतिकूल परिस्थितीमुळे सांगलीच्या बाजारपेठेत हळद रुसण्याची चिन्हे

प्रताप महाडिक ल्ल कडेगावजिल्ह्यात सर्वत्र हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने हळदीला अल्प दर दिला जात आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शासकीय गोदामे, शीतगृहे, तसेच खासगी गोदामात सुमारे साडेतीन लाख क्विंटल जुनी हळद शिल्लक आहे. आता यंदा सांगलीच्या बाजारपेठेत १० ते १२ लाख क्विंटल हळदीची आवक होण्याची शक्यता आहे. जुन्या हळदीचे दरही गडगडलेले असतानाच आवक वाढल्याने नव्या हळदीचे दरही घसरण्याची शक्यता आहे. सांगलीच्या बाजारपेठेत मागीलवर्षी आडेआठ लाख क्विंटल हळदीची आवक झाली होती. यंदा चांगला पाऊस आणि हवामानामुळे उत्पादनात वाढ झाली. सांगलीत सातारा, हिंगोली, नांदेड, जळगाव जिल्ह्यांसह कर्नाटक, सेलम, निजामाबाद येथून हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी २६ जानेवारीनंतर सांगलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हळद येणार आहे. प्रारंभीच्या सौद्याला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आवकेच्या मोठ्या ढिगाऱ्यात होणाऱ्या दराच्या अग्निपरीक्षेत हळद तरणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्यातीवर निर्बंध नाहीत हळद निर्यातीवर सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. तरीही हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. हळदीचे औषधी व आयुर्वेदिक महत्त्व अधिक आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यात लक्ष घातले, तर निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.हळदीला रामराम गेल्या अनेक वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी निराश होऊन चालूवर्षी बियाणांसहीत हळद शिजवली आहे. हे शेतकरी आता कंटाळून हळदीला कायमचा रामराम ठोकून अन्य पिके घेण्याच्या विचारात आहेत.