विटा : लेंगरे (ता. खानापूर) येथील हर्षवर्धन दिलीपराव बागल यांची खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी खानापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन बागल यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जाहीर केले.
हर्षवर्धन बागल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीपराव बागल व विद्यमान सरपंच राधिका बागल यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे आजोबा निवृत्ती गोविंद बागल यांनी खानापूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. हर्षवर्धन यांचा जनसंपर्क, संघटन कौशल्य, अभ्यासू वृत्ती या गुणांचा विचार करून त्यांच्यावर खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नूतन तालुकाध्यक्ष हर्षवर्धन यांचे पालकमंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर यांनी अभिनंदन केले.
फोटो : ०५ विटा १
ओळ : खानापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी हर्षवर्धन बागल यांची निवड झाल्यानंतर त्यांना माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी विराज नाईक, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.