शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हरिपूरच्या संशोधकाने उभारली ‘इनोव्हेशन फॅक्टरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:22 IST

सांगली : परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी सोडून हरिपूर (ता. मिरज) येथील एका संशोधकाने आपल्या ...

सांगली : परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी सोडून हरिपूर (ता. मिरज) येथील एका संशोधकाने आपल्या गावातच संशोधनाचा कारखाना उभारून नवनव्या प्रयोगांना जन्म दिला. इलेक्ट्रिकल सायकल, इलेक्ट्रिकल व्हिलचेअर, मोल्डलेस कंपोझिट फायबर, सोलर पॉवरबेस इलेक्ट्रिक रिक्षा असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत.

हरिपूर येथील प्रा. शाम गुरव यांनी अवकाश विषयावर नेदरलँड येथे डॉक्टरेट मिळवली आहे. मद्रास येथे त्यांनी एम.टेक्‌.चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एअरक्राफ्ट डिझायनिंग क्षेत्रात काम केले. नासाच्या एका प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. सध्या ते अहमदाबाद विद्यापीठात सल्लागार म्हणून काम करीत आहेत. परदेशात नोकरी व उद्योगाच्या अनेक संधी सोडून त्यांनी आपल्या गावातच काही तरी करण्याचा विचार त्यांनी केला. त्यातून त्यांनी ही फॅक्टरी हरिपूर येथे उभी केली. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अभियंत्यांना त्यांनी यात समावून घेतले. जिल्ह्यात शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा शोधत राज्यभर फिरणाऱ्या मुलांना रोजगार आणि संशोधनाची संधी देण्याचा विचार त्यामागे असल्याने गुरव यांनी ही फॅक्टरी सुरू केली.

सुरुवातीला त्यांनी अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हिलचेअरचा प्रयोग हाती घेतला. त्यात त्यांना यश मिळाले. ज्या व्हिलचेअरची बाजारात १ ते सव्वा लाख किंमत आहे, तितक्याच सुविधांची व्हिलचेअर ७५ टक्के कमी किमतीत त्यांनी तयार केली. लॉकडाऊन काळात त्यांनी इलेक्ट्रिकल सायकल तयार केली. छोट्या मोपेडचा फिल येणाऱ्या, पण सायकलचा लूक असणाऱ्या वजनाने अत्यंत हलक्या अशा इलेक्ट्रिकल सायकलचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही फॅक्टरी आनंद व त्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देणारी ठरत आहे.

कोट

प्रचंड आर्थिक कसरत करीत ही फॅक्टरी आम्ही सुरू केली. अभियंत्यांना या प्रकल्पात समावून घेताना परिसरातील गोरगरीब मजुरांनाही काम दिले आहे. फॅक्टरीची व्याप्ती वाढविताना व्यावसायिकतेपेक्षा समाजासाठी आवश्यक उपकरणांची परवडणाऱ्या दरात निर्मिती करण्याचा उद्देश आहे.

-प्रा. शाम गुरव, संशोधक हरिपूर