फोटो ओळ : शिराळा येथे ‘कामगार चळवळ’ या पुस्तिकेचे प्रकाशन आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते झाले. यावेळी धनाजी गुरव, ॲड. रवी पाटील, नगराध्यक्ष सुनीता निकम, विजयकुमार जोखे, दीपक कोठावळे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. राज्यकर्त्यांकडे त्याच्या न्यायिक हक्कासाठी भांडले पाहिजे. राबणारे हात सुखी असतील, तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.
येथील संत गाडगेबाबा स्मृती भवनात दत्तात्रय पाटील यांनी संपादन केलेल्या ‘कामगार चळवळ’ या पुस्तिकेचे प्रकाशन आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कॉ. धनाजी गुरव प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ॲड. रवी पाटील, नगराध्यक्ष सुनीता निकम, विजयकुमार जोखे, दीपक कोठावळे, विश्वास यादव, सभापती प्रतिभा पवार, सुनंदा सोनटक्के, मोहन जिरंगे, मारुती रोकडे, राजू निकम, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.