वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ते गर्दी करतील याचा अंदाज असल्याने अजितराव घोरपडे यांनी बाहेरगावी राहणेच पसंद केले व फोनवरून शुभेच्छा स्वीकारल्या.
सकाळी शेतकरी दूध संघाच्या कार्यालयात दिलीप झुरे, तुकाराम पाटील, नगराध्यक्ष पंडित दळवी यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री महादेव जानकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मकरंद देशपांडे, विक्रमसिंह पाटणकर आदींनी घोरपडे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
अजितराव घोरपडे म्हणाले, आजवरच्या जीवनात जनतेच्या कल्याणासाठी लढलो. यापुढेही आपला लढा सुरूच असेल. समाजातील उपेक्षित, वंचित घटक जोपर्यंत सुखी होत नाही, तोपर्यंत आपण मैदानात कायम राहणार आहे.
स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ नेते राजाराम पाटील, आरोग्य सभापती आशाताई पाटील, सुनील माळी, सुभाष सूर्यवंशी, चोरोचीचे सरपंच रावसाहेब पाटील, सुरेश सूर्यवंशी, सुनील पाटील, वैभव नरुटे, सनी पडळकर, तुकाराम पाटील, पांडुरंग पाटील, अरुण भोसले आदी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.