गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हणमंत बाळासाहेब पाटील यांची तर उपसरपंचपदी रावसाहेब आप्पासाहेब सरवदे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणपती औताडे यांनी काम पाहिले.
११ सदस्य असणाऱ्या गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले हाेते. सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये हणमंत बाळासाहेब पाटील यांना ६ मते तर विजय जयसिंग जाधव यांना ५ मते पडली. यावेळी हणमंत पाटील यांनी बाजी मारून सरपंचपदी विराजमान झाले तर रावसाहेब सरवदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
नूतन सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. सत्कारादरम्यान सरपंच श्री. हणमंत पाटील म्हणाले, गव्हाण गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदारांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासास आम्ही तडा जाऊ न देता सर्व समाजघटकांना एकत्रित घेऊन योग्य काम करू.
उपसरपंच रावसाहेब सरवदे म्हणाले, शासकीय निधीचा योग्य वापर करून गावच्या विकासाकडे झेप घेणार आहोत.
यावेळी ग्रामसेवक पांडुरंग कुंभार, तलाठी शिवाजी चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी पाटील, संतोष यादव, रवींद्र देसाई, एकनाथ पाटील, युवराज सरवदे, राजू यादव उपस्थित होते.
फाेटाे : १० गव्हाण १