शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी मुद्रांकाची तपासणी लटकणार

By admin | Updated: July 6, 2016 00:21 IST

नियमितीकरणाचा तिढा : खरा की खोटा, कोण ठरविणार?

शीतल पाटील-सांगली -महापालिका हद्दीतील गुंठेवारीच्या मुद्रांक पडताळणीस मुद्रांक विभागाने असमर्थता दर्शविली आहे. मुद्रांक खरा की खोटा, याची तपासणी करण्याची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नसून, महापालिकेने नाशिकच्या सुरक्षा मुद्रणालयामधून पडताळणी करून घ्यावी, असे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रलंबित आठ हजार प्रस्ताव पुन्हा लटकणार आहेत. आता याबाबत महापालिका काय भूमिका घेते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीच्यावतीने आरक्षणे व नियमितीकरणाबाबत लढा हाती घेतला आहे. मंगळवारी समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण, निमंत्रक अमर पडळकर, उत्तमराव कांबळे, संजय लवटे, शहाजी भोसले, बाबासाहेब संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व मुद्रांक जिल्हाधिकारी कऱ्हाड यांची भेट घेऊन चर्चा केली. गुंठेवारीतील प्लॉटची खरेदी दहा, वीस रुपयांच्या मुद्रांकावर झाली आहे. मध्यंतरी काही बोगस मुद्रांक असल्याचे उघड झाले. त्यामुळे पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या प्रक्रिया ठप्प आहे. मुद्रांक पडताळणीअभावी आठ हजार प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहेत. त्यावर बैठकीत चर्चा झाली. मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी, गुंठेवारी खरेदीच्या मुद्रांकाच्या सत्यतेबाबतची पडताळणी करणारी यंत्रणा या कार्यालयाकडे उपलब्ध नाही, या कार्यालयामध्ये केवळ संबंधित विक्रेत्यांच्या नोंदवहीवरून मुद्रांक विक्री क्रमांक, दिनांक दिला जातो. या माहितीवरून तो खरा आहे की खोटा हे ठरविता येत नाही. महापालिकेने त्याची सत्यता तपासणीसाठी ते नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसकडे पाठवावेत, असे पत्रच गुंठेवारी समिती व महापालिकेला दिले आहे. या पत्रामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे. गुंठेवारी समितीचे चंदन चव्हाण म्हणाले की, मुद्रांक पडताळणीमुळे आठ हजार प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. आता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणीची गरज नसल्याचे पत्र दिल्याने, प्रलंबित प्रस्तावांच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला. तसेच गुंठेवारी अधिकारी गौतम भिसे यांनी, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे महापालिकेला पत्र मिळाले असल्याचे सांगत, महापालिकेने विक्रेत्यामार्फत विक्री झाली की नाही, याची माहिती मागविली होती. इतर कारणासाठी मुद्रांक घेऊन त्यावर गुंठेवारीची खरेदी करण्यात आल्याचे काही प्रकरणात उघड झाले होते. त्यामुळेच या सत्यतेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले होते. आता आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)फौजदारी गुन्हे दाखल करासांगलीत गुंठेवारीचा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित झाला. गोरगरिबांनी एक, दोन गुंठे जागा घेऊन घरे बांधली. ती नियमित करण्यासाठी शासनाने कायदा केला. पण या गुंठेवारी कायद्याचा फायदा उठवित बिल्डर लॉबीनेही गुंठेवारीत मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार केले. मोठमोठी संकुले उभी केली. गुंठेवारीचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला गेला. या मुद्द्यावरही गुंठेवारी चळवळ समितीने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. त्यावर गायकवाड यांनी, गुंठेवारीचा व्यावसायिक वापर करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.