शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बारा गावांचा कारभार महिलांच्या हाती--कवठेमहांकाळ तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:19 IST

कवठेमहांकाळ : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे.

ठळक मुद्दे२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. यापैकी बारा गावांचा कारभार करण्याची संधी सावित्रीच्या लेकींना मिळणार आहे. सतरा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची धुरा वाहण्याची संधी पुरुषांना मिळणार असली तरी, तब्बल १२ गावांमध्ये महिला आरक्षण असल्याने तेथे महिला सरपंच म्हणून निवडून येण्यासाठीही मोठा संघर्ष होणार आहे.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या चांगलाच रंग भरला आहे. २२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यावर्षी सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने सरपंचपद मिळविण्यासाठी सर्वच राजकीय गट शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. २९ पैकी १२ गावात सरपंच पदाचे आरक्षण महिलांच्या वाट्याला गेल्याने या गावांचा कारभार थेट महिलांच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे या जागांसाठी सक्षम, सुशिक्षित महिला उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने, पक्षाबरोबरच उमेदवार कसा आहे, त्याची पात्रता काय आहे, हे तपासूनच मतदार मतदान करणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा चेहरा सरपंच पदासाठी देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, गट प्रयत्नशील आहेत.महिला आरक्षण...अलकूड (एम)- सर्वसाधारण स्त्री अलकूड (एस)- अनुसूचित जाती स्त्री, चुडेखिंडी- सर्वसाधारण, घाटनांद्रे- सर्वसाधारण स्त्री, केरेवाडी- सर्वसाधारण स्त्री, कोंगनोळी- सर्वसाधारण स्त्री, कुची- सर्वसाधारण स्त्री, कुकटोळी- सर्वसाधारण स्त्री, लोणारवाडी- अनुसूचित जाती स्त्री, नागज- ना. मा. प्रवर्ग स्त्री, सराटी- सर्वसाधारण स्त्री, विठुरायाचीवाडी- सर्वसाधारण स्त्री, या गावांतील सरपंचपद हे महिलांसाठी असणार आहे.तालुक्यातील आरक्षण...आगळगाव- सर्वसाधारण, आरेवाडी- अनुसूचित जाती, बोरगाव - ना. मा. प्रवर्ग, ढालेवाडी- सर्वसाधारण, हरोली- सर्वसाधारण, हिंगणगाव- ना. मा. प्रवर्ग, जाखापूर- सर्वसाधारण, जायगव्हाण- सर्वसाधारण, खरशिंग- सर्वसाधारण, लांडगेवाडी- ना. मा. प्रवर्ग, लंगरपेठ- सर्वसाधारण, मळणगाव- अनुसूचित जाती, रांजणी- सर्वसाधारण, शेळकेवाडी- सर्वसाधारण, शिंदेवाडी (हि)- सर्वसाधारण, शिरढोण- ना. मा. प्रवर्ग, वाघोली- अनुसूचित जाती. या ग्रामपंचायतींमधून पुरुषांना सरपंच म्हणून निवडून जाण्याची संधी मिळणार आहे.