शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

दगडफेकीतील जखमी तरुणाला मिळाला मदतीचा हात

By admin | Updated: June 22, 2014 00:29 IST

भगीरथ ग्रुपचा पुढाकार : दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान, हिंसक प्रवृत्तीला उत्तर देत सामाजिक जाणिवेचा नवा संदेश

सांगली : हिंसक वृत्तीने एकीकडे उच्छाद मांडला असला, तरी दुसऱ्या बाजूला सामाजिक जाणिवा असलेली मनेही तितकीच सक्षमपणे उभी आहेत. दंगलखोराने फेकलेल्या दगडाने गंभीर जखमी झालेल्या आप्पासाहेब म्हारगुडे या तरुणाला तितक्याच वेगाने मदतीचा हात देणाऱ्या भगीरथ ग्रुपने या गोष्टीची प्रचिती शुक्रवारी दिली. या गु्रुपने या तरुणाला दहा हजार रुपयांची मदत केली. फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याच्या वृत्ताने बारा दिवसांपूर्वी सांगलीतील वातावरण बिघडले होते. या घटनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील आप्पासाहेब चंद्रकांत म्हारगुडे (वय २३) या तरुणाला दंगलखोरांच्या हिंसक वृत्तीचा फटका बसला. एसटीवर फेकलेल्या एका दगडाने दुचाकीवरून चाललेल्या आप्पासाहेबचा वेध घेतला आणि तो गंभीर जखमी झाला. कवटीला जोराचा मार लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. दारिद्र्याशी संघर्ष करीत जगणाऱ्या म्हारगुडे कुटुंबियांवर या घटनेचा मोठा आघात झाला आणि आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे गणितच बिघडले. या तरुणाची कहाणी ‘लोकमत’ने १९ जून रोजी प्रसिद्ध केली. मदतीचे आवाहनही केले. त्यानंतर लगेचच सांगलीच्या भगीरथ ग्रुपने या तरुणाला मदतीचा हात दिला. ग्रुपचे संचालक दीपककुमार पाटील यांनी हे वृत्त वाचल्यानंतर ‘लोकमत’शी संपर्क साधला आणि मदतीचा हात पुढे केला. भगीरथ ग्रुप आणि रोटरी क्लब आॅफ सांगली सिटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रक्तदान, नेत्र व दंत तपासणी शिबिर पार पडले. या कार्यक्रमातच त्यांनी आप्पासाहेबच्या आजी कमल दगडू अर्जुन यांना दहा हजार रुपयांचा धनादेश दिला. उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्याहस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी संदीप हसबनीस, संतोष मोहिते, किरण तारळेकर उपस्थित होते. दीपककुमार पाटील म्हणाले की, ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर माझ्या मनालाही वेदना झाल्या. अशी एखादी हिंसक घटना घडत असताना त्याचा फटका निष्पाप लोकांना कसा बसू शकतो, ही गोष्ट या घटनेतून समोर आली. आप्पासाहेबची परिस्थिती बिकट असल्याने त्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय ग्रुपने घेतला. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनीही जखमी म्हारगुडेची परिस्थिती पाहून सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)