शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

हमाल-व्यापारी वादाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: January 6, 2015 00:48 IST

दोन्ही गटाकडून चर्चाच नाही : माथाडी बोर्डाच्या बैठकीस व्यापाऱ्यांची दांडी; मालाचे तीनशे ट्रक सहा दिवसांपासून उभे

सांगली : हमाल आणि व्यापारी दोन्ही संघटना आप-आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. हमाल पंचायतीने दि. १ जानेवारीपासून सुरु केलेले आंदोलन आज (सोमवारी) सुरुच होते. एक पाऊल मागे सरकण्यास हमाल आणि व्यापारी तयार नाहीत. यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचा माल घेऊन आलेले तीनशे ट्रक उभेच आहेत. दिवसाला ट्रक मालकांचे भाडे वाढत असून, त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे. शेती मालाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. आंदोलनामुळे व्यापारी, हमालांचे नव्हे, तर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा जिल्हा प्रशासन आणि राजकर्तेही गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे वाटोळे सुरुच आहे.हमाल पंचायतीच्या आडमुठ्या धोरणाने व्यवहार ठप्प : सारडासांगली : हमालीच्या दरवाढीवर चर्चा सुरू असतानाच अचानक १ जानेवारीपासून हमाल पंचायतीच्या नेत्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करून बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प केले आहेत. यामुळे बाजार समितीमधील ६० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यास हमाल पंचायतीचे आडमुठे धोरणच जबाबदार आहे, असा आरोप चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी आज (सोमवारी) केला. हमाल कामावर हजर झाल्याशिवाय त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.ते म्हणाले की, हमाली दरवाढीच्या प्रश्नावर १ जानेवारीपूर्वी हमाल व व्यापाऱ्यांमध्ये दोन बैठका झाल्या. हमाल पंचायतीची ७५ टक्के हमाली वाढीची मागणी होती. चर्चेमध्ये ते ३० टक्केपर्यंत खाली आले होते. आम्ही व्यापारीही सात टक्के वाढीवरून नऊ टक्क्यापर्यंत चर्चा सुरू ठेवली होती. अशी सकारात्मक चर्चा सुरू असताना अचानक हमाल पंचायतीने १ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. हमालांच्या या आंदोलनामुळे गेल्या पाच दिवसात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत माल भरून आलेले तीनशे ट्रक येऊन थांबले आहेत. सुमारे ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हमालांच्या आंदोलनामुळे सांगली बाजार समितीकडे येणारा गूळ कोल्हापूर, सोलापूर, बार्शी आदी बाजारपेठेत गेला आहे. काही शेतकऱ्यांचा माल घेवून आलेल्या ट्रक गेल्या तीन ते चार दिवसापासून बाजार समितीत थांबून आहेत. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारहमाल पंचायतीच्या आंदोलनामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी, माथाडी बोर्ड आणि पणन मंत्र्यांना देणार आहे, असे सारडांनी सांगितले.आंदोलनास पाठिंबाहमाल पंचायतीच्या आंदोलनास आज (सोमवारी) आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, शंभोराज काटकर आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला. मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळेच संप लादला : विकास मगदूम सांगली : संपाची सूचना आम्ही पंधरवड्यापूर्वीच दिली आहे. व्यापाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने संप करावा लागला. चर्चेसाठी आम्ही कधीही तयार आहोत. सांगलीमध्ये हमालीचा सर्वाधिक दर असल्याची दिशाभूल करणारी निवेदने व्यापाऱ्यांकडून दिली जात आहेत. हमाली वाढ होत नाही, तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे. हा संप व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे लादला गेला आहे, असा आरोप हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी आज (सोमवारी) केला.येथील मार्केट यार्डमध्ये हमाली वाढवून देण्यासाठी हमालांनी संप सुरू केला आहे. याबाबत मगदूम म्हणाले की, चर्चा चालू असताना अचानक हमालांनी संप केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. हमालीचे दर वाढून मिळावेत म्हणून पंधरा दिवसांपूर्वीच चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. त्यांच्याशी बोलणीही झाली आहेत. पंधरा दिवसात व्यापाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यानंतरच आम्ही आंदोलन सुरु केले आहे. तीस टक्के हमाली वाढ देण्यात यावी, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांकडून याबद्दल कोणतेही ठोस उत्तर नाही. सोमवार, दि. ५ रोजी माथाडी बोर्डात अधिकाऱ्यांनी हमाल-व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. या बैठकीस व्यापारी वेळेत हजर राहिले नाहीत. यावरून कोण मुजोर झाले हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)