शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

गुंठेवारीतील कामे थांबविली

By admin | Updated: December 17, 2015 01:25 IST

स्थायी समिती सभा : सदस्यांचा विरोध; दीड कोटीचा निधी मंजूर

सांगली : गुंठेवारी नियमितीकरणांतर्गत प्रशमन व विकास शुल्क न भरलेल्या भागात विकासकामे करण्याचा डाव बुधवारी स्थायी समिती सभेत हाणून पाडला. काँग्रेससह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ही कामे थांबवून त्याची फेरपडताळणी करण्याची मागणी केली. सभापती संतोष पाटील यांनीही या कामाची निविदा प्रसिद्ध न करता त्या फायली पुन्हा स्थायीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सभापती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायी समितीची सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांच्यासह इतर सदस्यांनी गुंठेवारी भागात दीड कोटीच्या कामांवर आक्षेप घेतला. प्रशमन व विकास शुल्क न भरलेल्या भागात ही कामे होत आहेत. त्यामुळे शुल्क भरलेल्या नागरिकांवर अन्याय होणार आहे. यापूर्वी स्थायी समितीने ही कामे थांबविण्याचे आदेश दिले होते. तरीही बांधकाम विभागाकडून या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पाटील यांनी निविदा प्रसिद्ध न करता त्या फाईली पुन्हा स्थायीकडे सादर करण्याचे आदेश दिले. कुपवाड येथील भारत सूतगिरणी ते जकात नाका या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरात पॅचवर्कचे काम सुरू असताना, या रस्त्यावरही पॅचवर्क करावे, अशी मागणी शेडजी मोहिते यांनी केली. एलबीटी विभागाकडील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची शिपाई म्हणून नव्या कार्यालयात नियुक्ती करावी, असा मुद्दा मोहिते यांनी मांडला. त्यावर उपायुक्त सुनील नाईक यांनी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. निर्मला जगदाळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे समान वाटप झाले नसल्याचे सांगितले. अनेक कार्यालयात सफाई कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना मूळ जागेवर परत पाठविण्याचे आदेशही झाले आहेत. पण ते काम करण्यास तयार नाहीत. चारही प्रभाग समितीत सफाई कर्मचाऱ्यांचे असमान वाटप झाल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)सुरक्षारक्षक विनावेतन!कुपवाडच्या नवीन प्रशासकीय इमारतीत सुरक्षारक्षक नाहीत. आताच दोन खिडकीच्या काचा फोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी तीन सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाने सध्या जे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत, त्याचेच पगार देण्यात आलेले नसल्याने नवीन नियुक्ती करता येणार नाही, असा खुलासा केला.