शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फायली मार्गी लावा, अन्यथा घरी पाठवू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित फायलींचा ढीग पडला आहे. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही या फायली मार्गी लागत नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुदतीत फायली निकाली निघाल्या पाहिजे, अन्यथा अधिकारी, कर्मचाºयांना घरी पाठवू, असा इशारा स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते यांनी बुधवारी दिला.सातपुते म्हणाले की, ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित फायलींचा ढीग पडला आहे. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही या फायली मार्गी लागत नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुदतीत फायली निकाली निघाल्या पाहिजे, अन्यथा अधिकारी, कर्मचाºयांना घरी पाठवू, असा इशारा स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते यांनी बुधवारी दिला.सातपुते म्हणाले की, महापालिकेच्या नगररचना, बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, ड्रेनेजसह सर्वच विभागांचा कारभार एकूणच बेशिस्तपणे चालू आहे. या सर्व कारभाराला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात आढावा बैठकीतच कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या स्थायी समिती बैठकीतच पुढच्या सभेत मागील आदेशाची अंमलबजावणी झाल्याचा अहवाल घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ९९ टक्के कामे झाल्याची शिस्त लावली आहे. अधिकाºयांची मनमानी यापुढे चालणार नाही.नगररचना विभागातही दलालांचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी आहेत. दलालाशिवाय फाईल हलत नाही, असा अनुभवही नागरिकांना येतो. फायली गायब होण्याचे प्रकारही घडत होते. बांधकाम परवाने, गुंठेवारीपासून ते नियमितीकरणाच्या प्रक्रियेत या विभागाचा कारभार सुरू होता. त्यामुळे या विभागाच्या अधिकाºयांचे, कर्मचाºयांचे काम, जबाबदाºया आणि वेळेचा लेखाजोखाच मागविला होता. तो बुधवारी सादर झाला. त्यानुसार संबंधित अधिकाºयांना हे काम त्या-त्या वेळेत करण्याची लेखी हमीच घेतली आहे. ज्याला जमत नसेल त्याने तसे कळवावे, त्याला कार्यमुक्त केले जाईल, असेही ते म्हणाले.महापालिका कार्यालयात अनेकदा अधिकारी, कर्मचारीच उपस्थित नसतात. हजेरी लावून अनेकजण गायब झालेले असतात. कोणत्याही कामासाठी जाताना पूर्वकल्पना दिलीच पाहिजे. बदली व्यक्तीलाही कामाची पूर्ण माहिती असलीच पाहिजे. कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी आता कामगार, अधिकाºयांसोबत अचानक कार्यालयांना भेटी देऊन तपासणी करणार असल्याचेही सातपुते यांनी यावेळी सांगितले.