शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याविरोधात पालकमंत्र्यांनी दडपशाही करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

सांगली : सांगली आणि मिरजेची बाजारपेठ शुक्रवारपासून उघडली जाईल. व्यापाऱ्यांसोबत फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक नियमांचे पालन करून ‘पुनश्‍च ...

सांगली : सांगली आणि मिरजेची बाजारपेठ शुक्रवारपासून उघडली जाईल. व्यापाऱ्यांसोबत फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक नियमांचे पालन करून ‘पुनश्‍च हरिओम’ करतील. कोरोना नियंत्रणात पालकमंत्री जयंत पाटील अपयशी ठरले आहेत. त्यांनी हे मान्य करून कोरोना प्रतिबंधाच्या अन्य उपाययोजनांवर लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलीस, प्रशासनाकडून दडपशाहीचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केले.

ते म्हणाले, गेली दीड वर्षे व्यापाऱ्यांनी संयम दाखवला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले आहे. साडेतीन महिन्यांत बंद पाळूनही कोरोना कमी झाला नाही. त्यासाठी इतर पर्याय शोधावे लागतील. त्यावर पालकमंत्र्यांनी विचारमंथन करावे. वाळव्याचे दुखणे घेऊन सांगलीवर राग काढू नये. इथली बाजारपेठ मोडण्याचा छुपा डाव कुणी आखला असेल तर त्याला सांगलीकर थारा देणार नाहीत.

पालकमंत्र्यांनी सांगली, मिरजेतील व्यापारीपेठांत येऊन लोकांच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. राज्य शासनातील एक वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचा निर्णय ते घेऊ शकले असते. मुख्यमंत्री त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत; पण सांगलीतील अपयश लक्षात घेता मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन मान्यता घ्यायला ते घाबरत आहेत. आता त्यांनी व्यापाऱ्यांना थांबवू नये. शुक्रवारपासून दुकाने उघडली जातील. पोलीस, प्रशासनाने दडपशाही केली तर असहकार पुकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.