शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनानिविदा औषध खरेदी रोखली

By admin | Updated: July 21, 2016 23:59 IST

स्थायी समिती सभा : आर. आर. आबांच्या नावाने आदर्श ग्रामपंचायत योजना

सांगली : जिल्हा परिषदेकडील साहित्य खरेदीच्या प्रक्रियेवरून जोरदार वाद-प्रतिवाद होत असतानाच, गुरुवारी आरोग्य विभागाने ४६ लाखांच्या औषध विनानिविदा खरेदीचा प्रस्ताव स्थायीसमोर मांडला. औषध खरेदी दरकरारानुसार न करता ई-निविदा प्रक्रियेतूनच खरेदी करण्याची मागणी सदस्यांनी करत प्रस्तावाला विरोध केला. दरम्यान, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने आदर्श ग्रामपंचायत योजना सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत झाला व या योजनेची सुरूवात आबांच्या जयंतीदिनापासून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. सभेत आरोग्य विभागाने दरकरारानुसार ४६ लाख रूपयांच्या औषध खरेदीचा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला. मात्र, खरेदीवरून अडचणी निर्माण झाल्याने औषधांची खरेदी करताना ती ई-निविदा प्रक्रिया राबवून करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर शासनाच्या अध्यादेशानुसार तीन लाखांपेक्षा जादाची खरेदी ई-निविदेतून करण्याचा प्रस्ताव असल्याने यातूनच खरेदी करण्यावर सदस्य ठाम राहिल्याने हा विषय तहकू ब करण्यात आला. आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र देऊनही ते हजर झाले नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. यावर शिक्षकांना १५ आॅगस्टपर्यंत मुदत देऊन त्यानंतर ते प्रमाणपत्र रद्द करून नव्या शिक्षकांना एनओसी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत ग्रामपंचायतीमध्ये अपहार झालेल्या ११६ प्रक रणांची वसुली, मालमत्ता निर्लेखन रकमेची येणेबाकी, शिक्षकांचे पगार एक तारखेलाच होतील, काम वाटपापूर्वी काम झाल्याची तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल, आरोग्य केंद्रातील सौरदिवे बंद असल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. नवीन साहित्य खरेदीबाबत सर्वसाधारण सभेत घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)आर. आर. आबांच्या नावाने योजनामाजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने आदर्श ग्रामपंचायत योजना सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. यात प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायती व जिल्हा पातळीवरही तीन ग्रामपंचायती निवडण्यात येणार आहेत. याबाबतचे निकष ठरविण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाला देण्यात आले. यावर्षीपासूनच योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.