शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 प्रचार साहित्याला जीएसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:21 IST

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवार व समर्थकांची धावपळ सुरू असून, सर्वच पक्षांचा ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवार व समर्थकांची धावपळ सुरू असून, सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, एलईडी दिव्यांचे जॅकेट यांसह हायटेक प्रचार साधनांचा वापर सुरू आहे. पण प्लास्टिक बंदी व जीएसटीमुळे प्रचार साहित्याच्या किमतीत सुमारे ३० टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना तसेच महिलांसाठी बिल्ल्यांचा हार, याशिवाय प्रचार पत्रके, झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले आदी पारंपरिक प्रचार साहित्य पक्षांकडून देण्यात आले आहे. मात्र डमी मतदान यंत्र, स्टेज व्हॅन, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅन, एलईडी सायकल डेमो, उमेदवाराचा माहितीपट, सोशल मीडियावर प्रचाराची व्हिडीओ क्लीप, एसएमएसद्वारे व्हॉईस कॉल, कलाकारांच्या आवाजात उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिफीत, पथनाट्य, मतदारांची नावे, महिला, पुरूष, जात, वय, पत्ता अशा वर्गीकरणाची सोय असलेले मोबाईल अ‍ॅप उमेदवारांना स्वखर्चाने उपलब्ध करावे लागत आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदारांना बुथनुसार मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय आहे. मोठ्या सभा, मेळावे व कोपरा सभेसाठी खुर्च्या व ध्वनिक्षेपकाची सोय असलेल्या स्टेज व्हॅन उपलब्ध आहेत. त्यांचे प्रति दिवस भाडे १० हजार रुपये, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅनचे प्रति दिवस भाडे १० हजार रुपये आहे. उमेदवाराच्या एलईडी दिव्यांची सोय असलेल्या डेमो सायकलची सुमारे १४ हजार रुपये किंमत आहे. उमेदवाराचे चिन्ह व ध्वज असलेल्या एलईडी जॅकेटची १० हजारापर्यंत किंमत आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून उमेदवाराच्या प्रचाराचा ३० मिनिटांचा माहितीपट तयार करण्यासाठी १ लाख रुपये खर्च आहे. ८ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत झेंडे, बिल्ल्यांचा हार २० रुपये, डमी मतदान यंत्र १५० रुपये, मफलर ५ ते १० रुपये अशा प्रचार साहित्याच्या किमती आहेत. अ‍ॅपद्वारे उमेदवार मतदारांच्या मोबाईलवर पोहोचणार असले तरी, अडाणी, अशिक्षित व स्मार्ट फोन नसलेल्या मतदारांसाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपांचा वापर करावाच लागणार आहे. हायटेक व प्रचार साधन म्हणून लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघातील बुथनिहाय मतदारयादी असलेल्या मोबाईल अ‍ॅपची किंमत लाखात आहे. प्लास्टिक बंदीमुळे झेंडे, टोप्या, दुचाकीचा झेंडा अशा प्रचार साहित्यावर संक्रांत आली असून, जीएसटी करामुळे प्रचार साहित्य सुमारे ३० टक्के महागल्याचे विक्रेते शमशोद्दीन बारगीर व सुनील मोतुगडे यांनी सांगितले.चीनचे साहित्य : बाजारात आवकमहागड्या व हायटेक प्रचार साधनांचा वापर करणाºया उमेदवारांना यावेळी जीएसटी क्रमांक असलेली खर्चाची बिले द्यावी लागणार असल्याने, निवडणूक प्रचार खर्चाची मर्यादा न ओलांडण्याची कसरत करावी लागत आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाºया रिक्षाचे दररोजचे एक हजार रुपये भाडे व ध्वनिक्षेपकासाठी ८०० रुपये भाडे आहे. प्रचार साहित्यासाठी वापरण्यात येणाºया कापडावर व छपाईवर असलेला जीएसटीचा १२ टक्के दर ५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने प्रचार साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात छपाई महाग असल्याने चीनमधून छापील प्रचार साहित्याची आयात होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक