शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांत वाढ--वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:24 IST

कुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ

ठळक मुद्दे नागरिकांनी या प्राण्यांना आपले मित्र म्हणून वागणूक द्यावीप्रगणनेवेळी मागीलवर्षी सहाशे वन्यप्राणी आढळून आले

महालिंग सलगर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ झाली आहे. वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे ही वाढ होऊ लागली आहे. या वन विभागाच्या सर्वेक्षणात मांसभक्षी प्राण्यांबरोबरच तृणभक्षी प्राण्यांचीही वाढ झाली आहे. रानडुक्कर, ससा, वानर या प्राण्यांची संख्या तर सततच वाढू लागली आहे.

जिल्ह्यात वन विभागाच्या अधिपत्याखाली ४२ हजार हेक्टर वनक्षेत्र कार्यरत आहे. हे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पाच टक्के आहे. या वनक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील हरित वृक्ष आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वनांचा समावेश आहे. या वृक्षांमध्ये लिंब, बाभूळ, खैर, बोर, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे. वन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात एका बाजूला सधन आणि एका बाजूला दुष्काळी पट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वनक्षेत्रात या प्रकारचे वृक्ष आढळून येतात.

जिल्ह्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत चांगली वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मांसभक्षी प्राण्यांबरोबर तृणभक्षी प्राण्यांचीही वाढ चांगल्या प्रमाणात होऊ लागली आहे.

जिल्ह्यात शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, जत, कडेगाव, सांगली या वन परिक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये खानापूर-विटा या तालुक्याचा क्रमांक लागतो, तर सर्वात कमी संख्या असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सांगलीचा समावेश होतो. प्रगणनेवेळी मागीलवर्षी सहाशे वन्यप्राणी आढळून आले, तर यंदा करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी ६७४ वन्यप्राणी आढळून आले.

वन विभागाकडून जंगलातील पाणवठे आणि वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणांवरील प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून ही गणना केली आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणात रानडुक्कर, ससा, वानर, माकड, कोल्हा, साळिंदर, गवा, लांडगा, शेकरू या वन्यप्राण्यांचा समावेश आढळून आला आहे. वन विभाग क्षेत्रात रानडुक्कर, ससा, वानर या प्राण्यांची संख्या सतत वाढत आहे.नदीकिनाºयावर १५ मगरी आढळल्या...सांगली आणि शिराळा वन परिक्षेत्रामध्ये नदीकिनाºयावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन विभागाला सुमारे १५ मगरी आढळून आल्याचीही माहिती संबंधित वन परिक्षेत्र विभागातून मिळाली. या प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत म्हणून हे वन्यप्राणी आढळल्यास त्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या त्यांच्या अधिवास क्षेत्रात सोडण्याचे कामही वन विभागाकडून केले जात आहे.काटेकोर अंमलबजावणीवन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यावर या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून मानवाची हत्या झाल्यास त्वरित आठ लाखांची मदत दिली जाऊ लागली आहे. अपंगत्व आल्यास चार लाखांची मदत मिळते. पिकांचे नुकसान झाल्यासही त्वरित मदत दिली जाऊ लागली आहे. त्यामुळेही प्राण्यांच्या हत्या कमी होऊ लागल्या आहेत. वन विभागाच्या क्षेत्रात मांसभक्षीबरोबरच तृणभक्षी प्राण्यांत चांगली वाढ होऊ लागली आहे. नागरिकांनी या प्राण्यांना आपले मित्र म्हणून वागणूक द्यावी. त्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.