शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

उसावर करपा, भाताची वाढ खुंटली

By admin | Updated: August 4, 2015 23:40 IST

कमी पावसाचा फटका : सोयाबीन वगळता शिराळा तालुक्यात पिके असमाधानकारक

सहदेव खोत -पुनवत -शिराळा तालुक्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पीकपरिस्थिती असमाधानकारक आहे. तालुक्यात सर्वत्रच उसावर करपा व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. भाताची अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. परिणामी शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. कमी पावसामुळे तणांना पोषक वातावरण असून, यावर शेतकऱ्यांची शक्ती वाया जात आहे.शिराळा तालुक्यात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. आषाढ हा पावसाचा महिना. या महिन्यात सर्वत्र झडीचा पाऊस सुरू असतो. मात्र आतापर्यंत पावसाची परिस्थिती चांगली नसल्याने, ओढ्या-नाल्यांना पाण्याची खळखळ नाही. वाफ्यांमध्ये अद्याप पाणी साचलेले नाही. तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. तालुक्यातील पाऊस पाण्याचे चित्र विस्कटले आहे.कमी पावसाचा परिणाम ऊस व भात या पिकांवर झाला आहे. उसावर करपा व लोकरी माव्याने आक्रमण केले आहे. उसाची पाने करपल्याने जनावरांना चांगल्या दर्जाचा ओला चारा मिळेनासा झाला आहे. तालुक्याच्या भात या प्रमुख पिकाची स्थितीही असमाधानकारक आहे. भातवाफ्यात पाणी नाही. वाढ पुरेशी झालेली नाही. तणांचा जोर वाढला आहे. भातवाफ्यात शेतकऱ्यांना हात धुवायलाही पाणी नाही. ऊस व भात या पिकांच्या वाईट स्थितीमुळे शेतकरी चिंतातूर आहे. तालुक्यात फक्त सोयाबीन, भुईमूग या दोन तेलवर्गीय पिकांनाच कमी पावसामुळे काही प्रमाणात ‘अच्छे दिन’ आहेत. या दोनच पिकांची बऱ्यापैकी उगवण झाली आहे. सोयाबीन, भुईमुगाची परिस्थिती काहीशी चांगली असल्याने शेतकऱ्यांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.एकंदरीत शेतकऱ्यांनी पिकांवर खते, बियाणे, तणनाशके, कीडनाशके यासाठी मोठा खर्च करूनही ऊस व भात या प्रमुख दोन पिकांची कुचंबणा झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.