शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विविध संस्था, संघटनांकडून रविवारी अभिवादन करण्यात आले. सांगलीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विविध संस्था, संघटनांकडून रविवारी अभिवादन करण्यात आले. सांगलीत बसस्थानकानजीक बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त नितीन कापडणीस, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने सामुदायिक बुद्धवंदना झाली. यावेळी नितीन गोंधळे, किरण कांबळे, सुरेश दुधगावकर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी पुष्पहार अर्पण केला. आमदार सुधीर गाडगीळ, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके, संजय कांबळे, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, शहराध्यक्ष विजय आवळे, किरणराज कांबळे, परशुराम रणधीर, गॅब्रियल तिवडे, ताजुद्दीन शेख, शरद गाडे, भाजपचे अविनाश मोहिते, प्रियानंद कांबळे, नगरसेवक सुब्राव मद्रासी, दीपक कर्वे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आयुब पटेल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

सफाई कामगार संघटनेतर्फे अभिवादन

संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्यावतीने मिरजेत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी महापौर इद्रिस नायकवाडी व संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शरद सातपुते, दीपक बारिया, मुकादम गणेश धोतरे, सिद्धार्थ कांबळे, राकेश सरवदे, राजू धेंडे, परशुराम कांबळे, अझर मुल्ला, मयूर कांबळे, सनी कांबळे, विशाल बनसोडे उपस्थित होते.