स्व.हणमंतराव पाटील यांच्या अस्थी विसर्जन केलेल्या वृक्षाला युवानेते डॉ.अभिजीत पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शेखर बोडरे, विठ्ठल मदने, प्रताप पाटील, संतोष गायकवाड, सुरेश सातपुते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भाेसले सहकार पॅनेलने घवघवीत यश मिळविले. पेठ (ता.वाळवा) येथे हणमंत पाटील बुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गुलाल न उधळता, कार्यकर्त्यांनी आत्मशक्ती समूहाचे संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या घरी जाऊन प्रतिमेला अभिवादन केले. कृष्णा उद्योग समूहाचे संस्थापक स्व.जयवंतराव भाेसले यांच्यावर आयुष्यभर प्रेम करणारे आत्मशक्ती समूहाचे संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होती. हणमंतराव पाटील यांच्या अस्थी विसर्जन केलेल्या वृक्षाला युवानेते डॉ.अभिजीत पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आत्मशक्ती पतसंस्थाचे संचालक शेखर बोडरे, विठ्ठल मदने, प्रताप पाटील, संतोष गायकवाड, सुरेश सातपुते, जयवंत थोरावडे, अरुण सातपुते, विकास पाटील, अतुल पाटील, विजयभाऊ पाटील, सुमित पाटील, विजय पाटील, प्रदीप पाटील, विकास मगदूम उपस्थित होते.