शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारास जन्मभूमीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:11 IST

कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ३४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगावी देवराष्ट्रे येथे रविवारी, २५ रोजी विविध ...

कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ३४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगावी देवराष्ट्रे येथे रविवारी, २५ रोजी विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्ताने आ. मोहनराव कदम, आ. डॉ. विश्वजित कदम, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी देवराष्ट्रे येथे यशवंतरावांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, साहित्यिक अनिल बोधे, कवी प्रदीप पाटील, केन अ‍ॅग्रो कारखान्याचे संचालक धोंडीराम महिंद, क्रांती कारखान्याचे संचालक भीमराव महिंद, पंचायत समिती सदस्या स्मिता महिंद, माजी उपसभापती मोहनराव मोरे, तानाजी महिंद, प्रमोद गावडे, माणिक मोरे, बाळासाहेब पवार, आत्माराम ठोंबरे, लक्ष्मण पाटील, संजय मोरे, महादेवराव महिंद, मोहिते वडगावचे सरपंच विजय मोहिते, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील जगदाळे आदींसह ग्रामस्थ, युवक तसेच देवराष्ट्रे व परिसरातील यशवंतप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या जन्मघर स्मारकास भेट देऊन पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेण़्यात आला.स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार : संग्रामसिंह देशमुखयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे काम शेजारील जागेच्या भूसंपादन प्रक्रियेच्या पूर्णत्वाअभावी रखडले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या व संबंधित अधिकाºयांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करून रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.स्मारकप्रश्नी औचित्याचा मुद्दा : विश्वजित कदमयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाशेजारील जागा संपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे स्मारकाचे काम रखडले आहे. या कामासाठी २ कोटी १७ लाखांचा निधी आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेला आहे. यामुळे जमीन संपादनाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून रखडलेले काम पूर्ण करावे, यासाठी विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.