ओळी : अभियंता दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभियंत्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील तीन शहरांच्या विकासकामात अभियंत्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
अभियंता दिनानिमित्त महापालिकेच्या अभियंत्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता संजय देसाई, पाणीपुरवठा अभियंता परमेश्वर अलकुडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश सावंत, उपअभियंता वैभव वाघमारे आदी उपस्थित होते.
कापडणीस म्हणाले की, महापालिकेच्या विकासात आणि सौंदर्यीकरणात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक अभियंते हे चांगल्या पद्धतीने सेवा बजावत आहेत. अनेक नवनवीन संकल्पना वापरून चौक सुशोभीकरण, ट्रीमिक्स रस्ते तसेच दर्जात्मक विकासकामे पूर्ण केली आहेत. अभियंत्यांनी विकासात्मक दृष्टिकोनातून यापुढेही योगदान द्यावे, असे आवाहन केले.