ओळ : आष्टा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणसाठी इंटरनेट सुविधेसाठीची रक्कम डॉ. संतोष निगडी यांच्याकडे शांताबाई कमलाकर यांच्या कुटुंबीयांनी सुपुर्द केली. यावेळी डी.बी. कांबळे व अमोल पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणसाठी इंटरनेटची सुविधा शांताबाई विठोबा कमलाकर यांनी मोफत करून दिली. भादोले येथील शांताबाई कमलाकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी त्यांच्यावर आष्टा ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले. येथील डॉ. संतोष निगडी व कर्मचाऱ्यांनी शांताबाई कमलाकर यांच्यासह सर्वच रुग्णावर उपचार केले.
कोरोनातून शांताबाई बऱ्या झाल्या परंतु रुग्णालयाने व येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपचाराप्रती कृतज्ञता म्हणून शांताबाई कमलाकर व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयाला लसीकरणसाठी मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली. कर्मचाऱ्यांना आपल्या स्वत:च्या मोबाइलवरून फॉर्म भरून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करावी लागत होती. इंटरनेट सुविधा मिळाल्याने लसीकरण जलद गतीने होण्यास मदत मिळणार आहे.
शांताबाई कमलाकर यांच्या कुटुंबीयांनी राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष निगडी यांच्याकडे इंटरनेट सुविधेसाठीच्या खर्चाची रक्कम सुपुर्द केली. यावेळी डी.बी. कांबळे, अमोल पाटील, नीलम लोहार, नकुशा भुसनर यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.