शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख मेट्रीक टन खताचा कोटा मंजूर

By admin | Updated: May 11, 2016 00:53 IST

खरिपासाठी जिल्ह्याचा कोटा जाहीर; युरियाची मात्रा सर्वांत जास्त; गतवर्षीपेक्षा १४ मेट्रीक टनांची घट

प्रकाश पाटील -- कोपार्डे  --खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा परिषद कृषी विभागाकडून त्याबाबत काटेकोर धोरण अवलंबले आहे. या खरीप हंगामासाठी जिल्ह्यासाठी रासायनिक खतांचा एक लाख ४० हजार मे. टनाचा कोटा मंजूर झाला आहे. यात युरियाची मात्रा सर्वांत जास्त आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची मोठी सोय असल्याने रब्बी व खरीप दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र लागवडीखाली येते. ऊस या नगदी पिकाकडे जिल्ह्यातील क्षेत्राचा मोठा कल असतो. यामुळे रासायनिक खतासाठीही मोठी मागणी असते. सर्वसाधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृगाचा डोस ऊस उत्पादक ऊस पिकाला प्राथमिकता देऊन देतात. यावेळी शेतकऱ्यांकडून रासायनिक खताला मोठी मागणी असते. यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे विविध खतांची मागणी केली जाते.यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रासायनिक खताचा एक लाख ४० हजार ८०० मे. टनाचा कोटा मंजूर झाला आहे. यात ५८ हजार ९०० मे. टन युरिया खताचा सर्वांत जास्त कोटा आहे. तर संयुक्त खतांचा ३१ हजार ४०० मे. टनाचा कोटा आहे. मागील हंगामात एक लाख ५४ हजार मे. टन खतांचा कोटा कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता. मात्र, यात यावर्षी १४ मे. टनांची घट झाली असून, युरियाच्या मात्रेत पाच हजार मे. टनांची घट झाली आहे. शेतकरी सेंद्रिय खताकडे वळाल्याने तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे यात घट मानली जाते. यावर्षी खताचा कोटा मंजूर झाला असला तरी खतांची टंचाई भासणर नाही. मागील काही वर्षांपासून रासायनिक खतापेक्षा आंतरद्रव्य खतांबरोबरच सेंद्रिय खतांकडे शेतकरी जास्त वळला आहे. यावर्षी उसाच्या क्षेत्रातही ४ हजार हेक्टरनी घट असल्याने खतांची टंचाई भासणार नाही. - चंद्रकांत सूर्यवंशीजि.प. कृषी अधिकारीखरीप हंगाम २०१६ साठी मंजूर झालेली रासायनिक खतांची मात्रा पुढीलप्रमाणे. (मे. टनात)युरिया५८,९००एम. ओ. पी१६,२००एस. एस. पी.२१,१००डी. ए. पी.१३,२००संयुक्त खते ३१,४००एकूण १,४०,८००