आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाते. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अनुदान मागणीसाठी पुराव्यासह आपली नाव नोंदणी करणे आवश्यक असते. जिल्ह्यातून आतापर्यंत आंतरजातीय विवाह केलेल्या सुमारे २९० जोडप्यांनी अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे नाव नोंदणी केली आहे. मात्र सन २०१८ पासून नाव नोंदणी केलेली जोडपी शासनाकडून अनुदान रखडल्याने प्रतीक्षेत आहेत. अनुदानासाठी समाज कल्याण विभागाकडे हेलपाटे मारूनही रखडलेले अनुदान मिळत नसल्याने शासन ते कधी देणार अशी विचारणा आंतरजातीय विवाहित जोडपी करीत आहेत. शासनाने रखडलेले अनुदान देऊन आंतरजातीय विवाहितांना आधार द्यावा, प्रोत्साहन अनुदान न मिळाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशाराही पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांनी दिला आहे.
काेट
जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातून आंतरजातीय विवाह केलेल्या २९० जोडप्यांची नोंद आहे. सध्या अनुदानाचे ६० लाख रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जमा झालेल्या अनुदानाचे तातडीने वाटप करण्याची आपण मागणी केली आहे. त्यानुसार प्राप्त अनुदान वाटपाची कार्यवाही होईल.
मनोजकुमार मुंडगनूर जि. प. सदस्य, बेडग