शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडी सरकार जनतेच्या भावनेशी खेळते : सम्राट महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:24 IST

पेठनाका भाजपच्यावतीने सम्राट महाडिक नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जनतेचा कौल डावलून महाआघाडी सरकार ...

पेठनाका भाजपच्यावतीने सम्राट महाडिक नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जनतेचा कौल डावलून महाआघाडी सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे. सरकारला जनतेचे प्रश्न सोडवण्यात कोणतेही स्वारस्य नाही. तरी मुख्यमंत्री यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून ग्रहमंत्री अनिल देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी केली आहे. पेठनाका येथे शिराळा तालुका भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या नावाला देशात महाविकास आघाडीने बदनाम केले आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. याचा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. या विरोधातही हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सी. एच. पाटील, जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, वाळवा पश्चिम मंडळ अध्यक्ष सी. एच. पाटील, जिल्हा चिटणीस संजय घोरपडे, वाळवा तालुका सरचिटणीस डॉ. सचिन पाटील, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटसुते, वाळवा तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर, पेठचे उपसरपंच चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच अमिर ढगे, विश्वास पाटील, असिफ जकाते, अजित पाटील, अनिकेत सूर्यवंशी, अ‌‌भिमन्यू कदम, अक्षय खिलारे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करू तसेच वीज बिलासंदर्भात लवकरच इस्लामपूर येथे आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही यावेळी महाडिक यांनी जाहीर केले.