शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात ग्रामसेवकांच्या दांड्या वाढल्या

By admin | Updated: April 21, 2017 22:43 IST

प्रशासनाचा वचक नाही : तालुक्यात ग्रामपंचायतींच्या कारभारावर दुष्परिणाम

कडेगाव : कडेगाव तालुक्यात बहुतांश गावांतील ग्रामसेवक नेमणुकीच्या गावाकडे फिरकतही नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींकरिता ४४ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. मात्र या अधिकाऱ्यांचा ग्रामसेवकांवर वचक राहिलेला नाही. ग्रामसेवकांच्या दांड्या वाढल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ढिसाळ झाला आहे. अपवाद वगळता बहुतांशी ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांमधून होत आहे. सांगली, इस्लामपूर, विटा, कऱ्हाड, कडेगाव अशा शहरांच्या ठिकाणी किंवा स्वत:च्या मूळ गावी राहून कारभार पाहणारे अनेक ग्रामसेवक आहेत. ते नेमणुकीच्या गावातील ग्रामपंचायतीकडे फिरकतही नसल्याच्या तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत. काही ग्रामसेवक केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. कामचुकार ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विनाअडथळा काढले जाते. त्यामुळे एकप्रकारे अशा कामचुकार ग्रामसेवकांना पंचायत समितीचे प्रशासन अधिकारीच पाठबळ देत आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील काही सरपंच मंडळी अशा ग्रामसेवकांना पाठबळ देऊन हित जोपासण्यातच धन्यता मानत आहेत. कडेगाव पंचायत समितीतील बैठकीचे किंवा सांगलीला जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या कामाचे कारण सांगून ग्रामसेवक लोकांची दिशाभूल करतात . (वार्ताहर)कामचुकार ग्रामसेवकांची गय नाही : सभापती करांडे ग्रामसेवकांबाबत पंचायत समितीकडे ग्रामस्थांची तक्रार आल्यास त्याची लगेच दखल घेण्यात येईल. अशा ग्रामसेवकांची गय करणार नाही. कामचुकार ग्रामसेवकांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे यांनी सांगितले.विकास कामात ग्रामसेवकांची टक्केवारी काही ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे काम करण्यासाठी नव्हे, तर कामाची टक्केवारी घेण्यासाठीच ग्रामसेवक पदावर बसलो आहोत, अशा अविर्भावात वागतात. एखाद्या कामाची निविदा काढण्यापूर्वी ते काम टक्केवारी घेण्यासाठी सोयीच्याच ठेकेदाराला कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातात. सोयीच्या ठेकेदाराला काम मिळाले नाही तरीही, टक्केवारीचा विषय असतोच.