या वेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, पंचायत समिती सभापती दीपक मोहिते, उपसभापती अरुण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, डॉ. रागिणी पवार उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना दिल्या.
ते म्हणाले की, काही लोक खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतात, त्यांची माहिती प्रशासनाला मिळत नाही. ते रुग्ण बाहेर फिरणे ही गंभीर बाब आहे. याबाबत त्या हॉस्पिटलने प्रशासनास रुग्णांची माहिती द्यावी. कोणी बाहेर फिरताना दिसले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. घरीच सुविधा असतील तर त्यांना घरात ठेवा अन्यथा विलगीकरण केंद्रात ताबडतोब दाखल करा. अत्यवस्थ रुग्णांना जर कोणी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले नाही तर त्या हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल. कोणत्याही हॉस्पिटलने व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची अडवणूक करू नये. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना प्राधान्याने कोरोनाच्या लसी द्याव्यात.
चौकट
चाचण्या वाढवण्याचे आदेश
डॉ. कदम, आमदार लाड यांनी लोकांतून आलेले प्रश्न मांडले आणि ते प्राधान्याने सोडवावेत, अशी विनंती केली. तालुक्यात कोरोना चाचण्या कमी आहेत, त्या वाढवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.